लहानपणाच्या आठवणी होतील ताज्या! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साखर मलाई पराठा
पूर्वीच्या काळी सर्वच घरांमध्ये बनवला जाणारा लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे साखर पराठा. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं साखर पराठा खायला खूप जास्त आवडतो. साखर पराठा बनवून त्यावर मलाई टाकून खाल्यास अतिशय सुंदर लागते. घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात कायमच उपमा, शिरा, कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही चवदार आणि टेस्टी मलाई साखर पराठा बनवू शकता. अजूनही सगळ्यांचं तोंडात साखर पराठ्याची चव कायमच आहे. दुधाची साय आणि साखर हे पदार्थ लहान मुलांना खायला खूप जास्त आवडतात. याशिवाय साखर पराठा बनवण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये साखर पराठा लगेच तयार होतो. चला तर जाणून घेऊया मलाई साखर पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)