मुंबई : क्लिअरट्रिप (Cleartrip) या फ्लिपकार्ट कंपनीने (Flipcart Company) अद्वितीय लक्झरी प्रवास अनुभव देणाऱ्या प्रीमियम गेटवेजचे (Premium Getaways) अनावरण केले. सध्या ही सेवा २५ हून अधिक ठिकाणी असलेल्या ४० हून अधिक हॉटेल्ससोबतच्या सहयोगाने सादर करण्यात आली आहे. पुढील ६ महिन्यांमध्ये सर्व प्रमुख पर्यटन स्थळांना (Major Tourist Destinations) व्यापून घेणाऱ्या ५०० हून अधिक हॉटेल्सचा समावेश करण्यात येईल.
क्लिअरट्रिपच्या हॉटेल्स ॲण्ड अकोमोडेशनचे प्रमुख मनू ससीधरन म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या हॉटेल श्रेणीसह नवीन प्रवासाची सुरूवात करत असताना ग्राहक अनुभवामध्ये वाढ करण्यासाठी अभूतपूर्व नाविन्यता आणली आहे. आमच्या सर्व ऑफरिंग्जप्रमाणे आमच्या वापरकर्त्यांप्रती अणि दर्जाबाबत तडजोड न करता प्रवास सुलभ करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेमधून ‘प्रीमियम गेटवेज’ लाँच करण्यासोबत आमच्या व्यासपीठावर ‘यूआय/यूएक्स’ अपग्रेड करण्यात आले आहे. ही सुधारणा व्यासपीठाच्या ट्रेडमार्क आधारस्तंभांना अधिक चालना देईल, ज्यामुळे ते अधिक सर्वोत्तम व सुव्यवस्थित बनतील.’’
[read_also content=”उमेश पाल हत्याकांड : अश्रफचा मेहुणा सद्दामवर एक लाखाचे बक्षीस जाहीर, अनेक पथके घेत आहेत शोध https://www.navarashtra.com/crime/umesh-pal-murder-case-update-one-lakh-reward-announced-for-ashrafs-brother-in-law-saddam-many-teams-are-involved-in-the-search-nrvb-393355.html”]
‘प्रीमियम गेटवेज’सह आम्ही या मागणीची यशस्वीपणे पूर्तता करण्यास आणि आमच्या ग्राहकांना संस्मरणीय अनुभव देण्यास उत्सुक आहोत. आम्ही बोर्डमधील पर्यटकांच्या इच्छांनुसार आमच्या ऑफरिंग्ज विस्तारित करत राहू. हॉटेल्स २०२३ मध्ये क्लिअरट्रिपच्या विकास दृष्टिकोनाचा महत्त्वपूर्ण भाग असतील आणि ग्राहक संपादन, ग्राहक सहभाग व व्यवसाय विकास पैलूसंदर्भात मुख्य चालक असतील. कंपनीने नुकतेच त्यांच्या यशस्वी नेशनऑनव्हेकेशन समर सेल मोहिमेदरम्यान हॉटेल्स बुकिंग्जमध्ये ३.५ पट वाढीची नोंद केली.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 30 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-30-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]