सतत केस गळून पातळ झाले आहेत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा रिठा शाम्पू
चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, शारीरिक हालचालींची कमतरता, वातावरणात होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. याशिवाय शरीरात वाढलेल्या तणावामुळे त्वचा आणि केसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केसांची वाढ थांबणे, केस तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याचदा महिला दुर्लक्ष करतात. मात्र सतत गळत राहिल्यामुळे केसांमध्ये टक्कल पडण्याचीजास्त भीती असते. त्यामुळे वारंवार केस गळती होत असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सहा,शॅम्पूचा किंवा इतर महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र यामुळे केसांची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी केसांना सूट होणाऱ्या पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला वारंवार होणारी केस गळती थांबवण्यासाठी रिठा शॅम्पू तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. यामुळे तुमचे गळणे थांबून केस मजबूत होण्यास मदत होईल.
महिला केस स्वच्छ करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या शँम्पूचा वापर करतात. मात्र केमिकल रसायनांचा वापर करून बनवण्यात आलेले शँम्पू केसांसाठी प्रभावी नाहीत. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे शॅम्पू उपलब्ध असतात. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी रिठाचा वापर करून केस स्वच्छ करावे. या पदार्थाला फेस सुद्धा येतो. पूर्वीच्या काळी महिलांसह पुरुष सुद्धा केस स्वच्छ करण्यासाठी रिठाचा वापर करायचे.
आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवल्याने शरीराला होतात असंख्य फायदे, त्वचेवरील इन्फेक्शनचा धोका होईल कमी