चेहऱ्यावर केलेला मेकअप रिमूव्हर करण्यासाठी प्रियंका चोप्राने सांगितले 'हे' घरगुती पदार्थ
सुंदर दिसण्यासाठी महिला मेकअप करतात. मेकअप केल्यानंतर त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसते. सणावाराच्या दिवशी किंवा इतर वेळी ऑफिसला जाताना सुंदर मेकअप केला जातो. फाऊंडेशन, कन्सीलर, लिपस्टिक, मस्कारा इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करून मेकअप केला जातो. चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी वेगवेगळ्या ब्रँडचे मेकअप प्रॉडक्ट वापरले जातात. तसेच मेकअप काढण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या ब्रँडचे मेकअप रिमूव्हर वापरले जातात. मात्र बऱ्याचदा केमिकल युक्त मेकअप रिमूव्हर वापरल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. केमिकल युक्त प्रॉडक्टमुळे अनेकांच्या तोंडावर लाल चट्टे येणे, पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात.(फोटो सौजन्य – pinterest)
आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवल्याने शरीराला होतात असंख्य फायदे, त्वचेवरील इन्फेक्शनचा धोका होईल कमी
मेकअप केल्यानंतर तो व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे त्वचेवर तसाच चिटकून राहतो. त्वचेच्या बारीक छिद्रांमध्ये मेकअप तसाच राहतो. ज्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. मेकअप जास्त वेळ त्वचेवर राहिल्यामुळे त पेशींसह त्वचेची छिद्र बंद होतात. त्यामुळे मेकअप काढण्यासाठी योग्य प्रॉडक्टचा वापर करावा. अनेक महिला मेकअप रिमूव्ह करण्यासाठी क्लींजिंग बाम किंवा मायसेलर वॉटर खरेदी केले जाते. पण महागातील प्रॉडक्ट खरेदी करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयामुळे सगळीकडे फेमस आहे. ती मेकअप काढण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करते. नारळाच्या तेलाचा वापर करून मेकअप काढता येतो. मेकअप काढण्यासाठी सर्वप्रथम, नारळाचे तेल त्वचेवर लावून चेहरा व्यवस्थित चोळून घ्या. त्यानंतर टॉवेल गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात बुडवून हलक्या हाताने चेहऱ्यावर घासा. यामुळे मेकअप सहज निघून येईल आणि त्वचा स्वच्छ होईल. याशिवाय त्वचेवरील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा.