Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुण वयात हाडांमधून सतत आवाज येतो? मग आहारात करा ‘या’ कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश, ठिसूळ हाडे होतील मजबूत

हाडांमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कॅल्शियम असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. कॅल्शियम युक्त पदार्थ हाडांची झीज भरून काढण्यास मदत करतात आणि हाडे मजबूत ठेवतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 30, 2026 | 12:00 PM
तरुण वयात हाडांमधून सतत आवाज येतो? मग आहारात करा 'या' कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश, ठिसूळ हाडे होतील मजबूत

तरुण वयात हाडांमधून सतत आवाज येतो? मग आहारात करा 'या' कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश, ठिसूळ हाडे होतील मजबूत

Follow Us
Follow Us:

हाडे ठिसूळ होण्याची कारणे?
तरुण वयात हाडांमध्ये वेदना का होतात?
हाडे मजबूत करण्यासाठी काय खावे?

जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी वयाच्या ६० व्या वर्षानंतर होणारे आजार हल्लीन वयाच्या ३० व्या वर्षात होऊ लागले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येणे, उच्च रक्तदाब, कॅन्सर, खराब कोलेस्ट्रॉल, हृदयाचे आजार झाल्यानंतर संपूर्ण शरीरात असंख्य बदल दिसू लागतात. पण या बदलांकडे वेळीच लक्ष दिले जात नाही. तरुण वयात हाडांमध्ये वेदना, चालताना किंवा खाली बसताना गुडघे दुखणे, कंबर दुखणे, सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना यांसारकीं लक्षणे शरीरात दिसू लागतात. कमी वयातच पाठदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण कालांतराने शरीरातील हाडे ठिसूळ झाल्यानंतर हाडांमधून आवाज येण्यास सुरुवात होते. कॅल्शियमच्या कमतरतेचा परिणाम हाडांवर लगेच दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कॅल्शियमची पातळी वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

घरातील छोटी मोठी काम करताना थकल्यासारखे वाटते? मग शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा बदल

कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश:

कॅल्शियमची पातळी कमी झाल्यानंतर हाडांमधून सतत कटकट आवाज येणे, हाडांची झीज यांसारख्या समस्या वाढतात. या समस्या वाढल्यानंतर कॅल्शियमची पातळी भरून कढण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळ्या गोळ्या खाल्ल्या जातात. पण या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे मुतखडा होण्याची जास्त शक्यता असते. कॅल्शियम आणि शरीरातील इतर घटक एकत्र मिक्स झाल्यामुळे मुतखडा होतो. त्यामुळे गोळ्या किंवा कोणतेही सिरप पिण्याऐवजी आहारात कॅल्शियम असलेले पदार्थ खावे. हाडांना लोखंडासारखे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम असलेले पदार्थ खावेत. कोणत्याही गोळ्यांवर अवलंबून न राहता नैसर्गिक पद्धतीने शरीरात कॅल्शियम वाढवावे.

संध्याकाळच्या जेवणात चपाती खाण्याऐवजी नाचणीची भाकरी खावी. नाचणीची भाकरी खाल्ल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यासोबतच शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. नाचणीमध्ये असलेले शक्तिशाली घटक शरीरातील कॅल्शियमचे संतुलन भरून काढण्यासाठी मदत करतात. त्यामुळे नाचणीपासून बनवलेली पेज किंवा नाचणी सत्व नियमित खावे. हे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होऊन तात्काळ अर्ज मिळेल. तसेच वयाच्या चाळिशीनंतर बाहेरील तिखट, तेलकट पदार्थ खाण्याऐवजी नाचणीचे पदार्थ खावे.

ठिसूळ झालेल्या हाडांना पोषण देण्यासाठी नियमित एक ग्लास दूध प्यावे. दुधामध्ये भरपूर कॅल्शियम असते. एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद मिक्स करून प्यायल्यास हाडांना पोषण मिळेल. तसेच दुपारच्या जेवणात वाटीभर दही खावे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. दूध प्यायला आवडत नसेल तर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा.

उन्हाळ्यात शरीरसंबंधित दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, उद्भवू शकतो हार्ट अटॅकचा धोका

दैनंदिन आहारात नियमित पालेभाज्या खाव्यात. पालेभाज्यांमध्ये भरपूर कॅल्शियम आणि लोह असते. पालक, मेथी, मुळा किंवा इतर पालेभाज्या खाल्ल्यास हाडांना पोषण मिळेल. पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमसोबतच विटामिन, विटामिन के खूप जास्त असते. तसेच सकाळी उठल्यानंतर तीन किंवा चार भिजवलेले बदाम खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळेल आणि स्मरणशक्ती चांगली राहील. बदामामामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Constant noise from the bones at a young age then include these calcium rich foods in your diet brittle bones will become strong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Foods
  • strong bones

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
2

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
3

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर
4

Sleep Talking: झोपेत लोक बडबडतात का करतात? शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.