अंथरुणावर पडल्यानंतर लागेल शांत झोप! नियमित करा 'ही' योगासने, शरीरात दिसून येतील सकारात्मक बदल
दिवसभरात काम करून घरी आल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. शांत झोप घेतल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घ्यावी. झोपल्यामुळे आरोग्य सुधारते आणि तुम्ही दीर्घकाळ आनंदी राहता. पण आपल्यातील अनेकांना रात्री किंवा इतर वेळी झोपल्यानंतर अजिबात झोप लागत नाही. अपुऱ्या झोपेमुळे आरोग्य बिघडून जाते. अपचन, ऍसिडिटी इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी शांत झोप घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
चांगली झोप उत्तम आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी सात ते आठ तास झोपायला हवी. मात्र, आजच्या व्यस्त जीवनात थकवा जाणवतो पण झोप येत नाही. त्यामुळे ज्यांना चांगली झोप लागत नाही त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशा स्थितीत झोपण्यापूर्वी काही योगासने आणि स्ट्रेचिंग करून रात्री चांगली झोप येऊ शकते. अशा स्थितीत चांगली झोप आणि निरोगी मन आणि शरीरासाठी रात्री झोपण्यापूर्वी ही योगासने करा.
लभासन झोपेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी शलभासन योगाचा सराव करू शकता. हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा आणि दोन्ही तळवे मांड्यांच्या खाली ठेवा. आता पायाची टाच एकत्र करा आणि पायाची बोटे सरळ ठेवा. नंतर पाय वर करताना दीर्घ श्वास घ्या. काही काळ या स्थितीत राहिल्यानंतर, पूर्वीच्या स्थितीत या.
रात्री झोपेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही नियमितपणे शवासनाचा सराव करू शकता. हा योग रात्री झोपण्यापूर्वीही करता येतो. शवासन करण्यासाठी पाठीवर झोपावे आणि दोन्ही पायांमध्ये एक फूट अंतर ठेवावे. त्यानंतर पायापासून बोटांच्या दिशेने शरीर सैल सोडताना आरामात श्वास घ्या आणि संपूर्ण शरीर सैल सोडा. या आसनामुळे सर्व थकलेल्या स्नायूंना आणि खांद्यांना आराम मिळतो.
डोळ्यांची दृष्टी कमी झालेय? मग आता काय करायचं? ‘या’ टिप्स फॉलो करा
उत्तानासनाच्या नियमित सरावाने तुम्हाला लवकरच झोपेत फरक दिसेल, हे आसन करण्यासाठी सरळ उभे राहा. आता दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही हात वरच्या दिशेने हलवा आणि श्वास सोडा, नंतर हात जमिनीच्या दिशेने खाली करा आणि पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.






