
पित्तामुळे सतत आंबट ढेकर येतात? 'हे' घरगुती उपाय करून तात्काळ मिळवा आराम
दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. शरीरात वाढलेले कामाचा तणाव, पोषक घटकांची कमतरता, पाण्याची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर पचनक्रिया बिघडू लागते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात उपाशी पोटी कोणत्याही पदार्थांचे सेवन करणे टाळावे. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीराला हानी पोहचते. पित्ताच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांच्या शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. याशिवाय शरीरात पित्त वाढल्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा उलट्या येणे, सतत चक्कर येणे, डोकं दुखणे इत्यादी गंभीर समस्या शरीरात दिसू लागतात. (फोटो सौजन्य – iStock)
शरीरात पित्ताची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक लक्षणे दिसू लागतात. पित्त वाढल्यानंतर आंबट ढेकर किंवा डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतली जातात. पण यामुळे काहीवेळ आराम मिळतो. शरीरात वाढलेले आम्ल्पित्त आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेचा त्रास झाल्यानंतर पित्ताची पातळी वाढून उलट्या होऊ लागतात. तसेच शरीरात वाढलेले पित्त बाहेर प[पडून गेले नाहीतर डोकं दुखणे किंवा पोटात दुखू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली पित्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास तात्काळ आराम मिळेल.
शरीरात पित्ताची पातळी वाढल्यानंतर जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, खाण्यापिण्याची इच्छा न होणे, डोकं दुखणे, चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा. घरगुती उपाय आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. शरीरात हायपर ऍसिडिटी वाढल्यानंतर छातीमध्ये दुखणे किंवा श्वास घेताना अडचण निर्माण होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या समस्येला आयुर्वेदामध्ये आम्ल पित्त असे म्हणतात.
अपचनाची समस्या वाढली आहे? पोटात गॅस झाल्यानंतर शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना