फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर हातापायांमध्ये दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे
कॅन्सरचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकून जाते. घरातील एका व्यक्तीला कॅन्सर झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचं कोलमडून पडते. या गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर सुद्धा अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. जगभरात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे अनेक रुग्ण आहेत. काहींना योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. शरीरातील कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर झाल्यानंतर शरीरात सामान्य लक्षणे दिसू लागतात. फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर फुफ्फुसाच्या पेशींमध्ये वाढ होत जाते. फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे जगभरातील अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. फुफ्फुसांचा कॅन्सर धूम्रपान करणाऱ्या आणि धूम्रपान न करणाऱ्या लोकांनासुद्धा होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर हातापायांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.
हात आणि पायांवर फुफ्फुसांच्या कॅन्सरची सामान्य लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे डिजिटल क्लबिंग. या स्थितीमध्ये हातापायांच्या बोटाना सूज येते. याशिवाय बोट काहीप्रमाणात गोलाकार दिसू लागतात. याशिवाय नखं मऊ होऊन बोटांच्या आतमध्ये चिटकून जातात. रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीमध्ये बदल झाल्यानंतर शरीरात ही लक्षणे दिसू लागतात.
फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर कोणत्याही कारणाशिवाय हात पायांमध्ये वेदना होऊ लागतात. काहीवेळा या वेदना अतिशय असह्य असतात. तसेच हातापायांना सूज येऊ लागते. फुफ्फुसांमध्ये ट्यूमची वाढ झाल्यानंतर रक्तवाहिन्यांवर आणि नसांवर दबाव येतो, ज्याच्यामुळे हातापायांना सूज येते. कॅन्सर पसरल्यामुळे किंवा लसीका प्रणालीवर परिणाम झाल्यामुळे हळूहळू संपूर्ण शरीराला सूज येऊ लागते.
शरीरात फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणे दिसू लागल्यानंतर नखांचा रंग बदलू लागतो. हातापायांची नखं जांभळी किंवा निळ्या रंगाची दिसू लागतात. शरीरातील आक्सिजनच्या पातळीवर परिणाम झाल्यानंतर ही समस्या उद्भवते. याशिवाय काहीवेळा नखं रंगहीन किंवा रंगीत दिसू लागतात. त्यामुळे शरीरात वरील कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने औषध उपचार करावे.