बद्धकोष्ठता होईल कायमची नष्ट! आहारात नियमित खा 'ही' फायबर युक्त फळे, सकाळी उठल्यानंतर पोट होईल स्वच्छ
आतडे स्वच्छ करण्यासाठी उपाय?
फळे खाण्याचे शरीराला होणारे फायदे?
जुनाट बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी उपाय?
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न होणे, पोटात कायमच जडपणा जाणवणे इत्यादी समस्या हल्ली अतिशय सामान्य झाल्या आहेत. कारण धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. फायबरच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता वाढण्याची शक्यता असते. बद्धकोष्ठता झाल्यानंतर सकाळी पोट व्यवस्थित स्वच्छ न होणे, आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहणे इत्यादी अनेक कारणांमुळे अपचनाच्या समस्या वाढू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
नेहमी उशीरा पोहचता का? वेळेचं गणित बसत नाही, Time Blindness आजाराची लागण; काय आहे नक्की
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण शरीरासाठी अतिशय धोक्याचे ठरते. यामुळे पचनाच्या बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात असणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखरेचे प्रमाण न वाढवता शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये साचललेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पपई खायला खूप जास्त आवडते. पपईचे अतिशय आवडीने सेवन केले जाते. चवीला गोडसर असलेले फळ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. पपईमध्ये फायबर आणि विटामिन मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी पपईचे सेवन करावे. पपईमध्ये विद्रव्य फायबर आणि पपेन नावाचे पाचक घटक आढळून येते. अन्नाचे सुलभ पचन करण्यासाठी आणि आतड्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पपईचे सेवन करावे.
पेरूमध्ये खूप कमी ग्लायसेमिक इंडेक्स आढळून येतो. ज्यामुळे शरीरात निर्माण झालेली फायबरची कमतरता भरून निघण्यास मदत होते. पेरूमध्ये फायबर आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळून येते. यामुळे जास्तीची भूक लागत नाही. पेरू खाल्ल्यामुळे पोट भरलेले राहते आणि आतड्यांचे आरोग्य सुद्धा निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात नियमित किंवा आठवड्यातून दोनदा पेरू खाल्ल्यास शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीराला भरपूर फायदे होतील. यामध्ये असलेल्या घटकांमुळे आरोग्य चांगले राहते. डॉक्टरांच्या मते, नियमित एक सफरचंद खाल्ल्यास कधीच तुम्ही आजारी पडणार नाही. सफरचंदाच्या सालीमध्ये ‘पेप्टिक फायबर’ असते. फायबर युक्त पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांच्या हालचाली सुधारतात आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. जुनाट बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित एक सफरचंद खावे.
Ans: दररोज व्यायाम करा, ज्यामुळे सूक्ष्मजीवांमध्ये सकारात्मक बदल होतात.
Ans: दही, ताक, इडली, डोसा, कांजी, लोणचे हे आंबवलेले पदार्थ चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करतात.
Ans: प्रक्रिया केलेले (Processed) आणि साखरेचे पदार्थ खाणे, अँटीबायोटिक्सचा अतिवापर






