Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा केळीचे सेवन, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

नियम सकाळी उठल्यानंतर २ केळी खाल्ल्यास शरीराची पचनक्रिया सुधारण्यासोबतच आरोग्याला अनेक फायदे होतील. केळी खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया केळी खाण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 03, 2025 | 08:48 AM
रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' पद्धतीने करा केळीचे सेवन

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' पद्धतीने करा केळीचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:
  • रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत?
  • नियमित २ केळी खाल्ल्यास शरीराला होणारे फायदे?
  • थकवा- अशक्तपणा वाढल्यास कोणत्या पदार्थाचे सेवन करावे?
शरीर कायमच निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात खाल्लेले पदार्थ थेट शरीरावर परिणाम करतात. त्यामुळे कायमच पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि शरीरात आवश्यक घटकांची कमतरता निर्माण होते. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पोषण वाढवण्यासाठी सप्लिमेंट्स तर कधी एनर्जी ड्रिंक्स प्यायले जातात. पण यामुळे फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. अशावेळी आहारात नियमित २ केळी खावी. केळी खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि शरीराचे कार्य सुधारते. केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि सोडियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराचा उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.(फोटो सौजन्य – istock)

हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास ओढावेल मृत्यू

केळ्यांमध्ये विटामिन -सी, फायबर आणि मॅग्निज इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. केळी खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा भरून काढण्यासाठी केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आम्ही तुम्हाला नियमित दोन केळी खाल्ल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. केळी खाल्ल्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते आणि आरोग्य सुधारते.

पचनक्रिया सुधारते:

शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिडिटी, गॅस इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर दोन केळी खावी. केळी खाल्ल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुधारते. याशिवाय पचनक्रिया अधिक सुरळीत होते. रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. पोटात वाढलेल्या आम्लपित्त आणि गॅसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात केळी खावी.

वजन नियंत्रणात राहते:

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. डिटॉक्स ड्रिंक किंवा सप्लिमेंटचे सेवन केल्यामुळे शरीराचे तात्पुरते वजन कमी होते, पण पुन्हा एकदा वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. वजन कमी करण्यासाठी नियमित २ केळी खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात.केळी खाल्ल्यामुळे लवकर भूक लागत नाही, पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामध्ये कमी कॅलरीज असतात.

झपाट्याने कमी होईल १० किलो वजन! पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

त्वचेचे सौंदर्य टिकून राहते:

केळीमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामध्ये असलेल्या कोलेजनमुळे त्वचा कायमच तरुण राहते. अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नियमित २ केळी खावीत. केळी खाल्यामुळे चेहऱ्यावर वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते आणि त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume bananas this way to compensate for blood deficiency improve heart health and keep bones strong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • banana benefits
  • Health Care Tips
  • Improves digestion

संबंधित बातम्या

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी
1

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
2

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
3

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
4

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.