झपाट्याने कमी होईल १० किलो वजन! पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
जगभरात लठ्ठपणाच्या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे वजन झपाट्याने वाढ जाते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महागडे डाएट, सप्लिमेंट्स इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होत नाही. अचानक वाढलेल्या वजनामुळे मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, थायरॉईड इत्यादी गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करताना चुकीचा डाएट फॉलो करण्याऐवजी योग्य पद्धतीने वजन कमी करणे आवश्यक आहे. वजन वाढल्यामुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवू शकता.(फोटो सौजन्य – istock)
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायम निरोगी आणि चांगली जीवनशैली जगणे आवश्यक आहे. आहारात सतत जंक फूड किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी भात, पोळी, भाजी, डाळ, फळं, सॅलड आणि शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय नियमित व्यायाम करणे, योगासने, चालणे इत्यादी शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. शारीरिक हालचालीमुळे आरोग्य सुधारते आणि खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. आयुर्वेदिक उपाय कायमच प्रभावी ठरतात.
दीर्घकाळ निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आयुर्वेदिक उपाय करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. रोज सकाळी उठल्यानतंर कोणत्याही वेगळ्या सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी मेथी दाणे, ओवा, बडीशेप आणि जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर डिटॉक्स होते. ओवा जिऱ्याचे सेवन केल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यासोबतच शरीराची पचनक्रिया सुधारते. याशिवाय अळशीच्या बिया आणि कलौंजीच्या सेवनामुळे फॅट मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतात.
हिवाळ्यातील ही फळे फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण काढतील बाहेर, भरपूर खा; डॉक्टरांनी दिलाय सल्ला
आयुर्वेदिक मसाल्यांच्या वापरामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो आणि आरोग्य सुधारते. मसाल्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स युक्त गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. गॅस, आम्लपित्त आणि पोट फुगणे इत्यादी बऱ्याच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक पावडर खावी. शरीराचे वजन वाढल्यानंतर मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा थायरॉईड इत्यादी गंभीर समस्या उद्भवून आरोग्य बिघडते. त्यामुळे वजन कमी करणे आवश्यक आहे.
वजन कमी करताना व्यायामाची गरज आहे का?
वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे, पण नियमित व्यायाम देखील आवश्यक आहे.
आहार आणि पोषण?
भरपूर भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, लीन मीट आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ खा. मसूर, अंडी, नट्स आणि बिया यांसारख्या प्रथिने आणि निरोगी चरबीचे स्रोत समाविष्ट करा.






