शरीर डिटॉक्स करण्यासाठी गुणकारी काढा
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. सतत कामाचा तणाव, चुकीची जीवनशैली, सतत बाहेरचे पदार्थ खाणे, धूम्रपान इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडून जाते. शिवाय वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. प्रदूषणात वाढ झाल्यामुळे शरीरात अनेक हानिकारक विषारी घटक साचून राहतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करून जातात. विषारी पदार्थ साचून राहिल्यामुळे ऊर्जा, त्वचा, आणि पचनसंस्था इत्यादी गोष्टींवर परिणाम होतो. थंडीच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. या आजारांवर नैसर्गिक उपाय करून मात करण्यासाठी रोज या गुणकारी काढ्याचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला निरोगी राहण्यासाठी कोणत्या काढ्याचे सेवन करावे? काढा प्यायल्यामुळे आरोग्याला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपामध्ये पाणी घेऊन उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यात पुदिन्याची पाने, किसलेलं आलं, दालचिनी आणि वेलची टाकून मिक्स करून घ्या. टोपातील पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करून काढा थंड होण्यासाठी ठेवा. काढा थंड झाल्यानंतर त्यात थोडंसं मध किंवा गूळ टाकून प्या. यामुळे तुमचे शरीर डिटॉक्स होईल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक काढून टाकण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. यामुळे पोटात साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल. पोटात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे नेहमी काढा आणि डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. या पेयांचे नियमित सेवन केल्यास शरीरातील घाण स्वच्छ होईल आणि शरीर हलके वाटेल. त्यामुळे उपाशी पोटी नियमित या पेयांचे सेवन करा.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात डिटॉक्स पेयांचे किंवा काढ्याचे सेवन करावे. डिटॉक्स ड्रिंकमध्ये आले, पुदीना, लिंबू, आणि हळद इत्यादी अनेक घटक असतात, ज्यामुळे पोटात साचून राहिलेली घाण स्वच्छ होते. अपचन, गॅस, आणि पोटफुगी इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल. पचनक्रिया निरोगी असेल तर आतड्यांचे आरोग्य सुद्धा निरोगी राहते.
लाईफ स्टाईलच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वाढलेले वजन आणि पोटावर साचून राहिलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.पण वजन कमी करण्यासाठी प्रोटीन ड्रिंक पिण्याऐवजी डिटॉक्स पेयाचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेली चरबी जळून जाते.