उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ताक प्यायले जाते. नियमित एक ग्लास ताक प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. कॅल्शियम, प्रथिने आणि विटामिन बी १२, प्रोबायोटिक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ताक प्यायल्यामुळे आतड्यांमधील संतुलन कायम टिकून राहते आणि पचनाच्या समस्या उद्भवत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवसभरात किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी ताक प्यावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
दिवसभरात किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी ताक प्यावे? जास्त प्रमाणात ताक प्यायल्यास शरीराचे होईल गंभीर नुकसान

ताकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक आढळून येतात, यामुळे आतड्यांचे आरोग्य कायमच हेल्दी राहते. आतड्यांच्या कार्यात अडथळे येऊ नये म्हणू ताकाचे सेवन केले जाते. ताकामधील चांगल्या बॅक्टरीया आतड्या शोषून घेतात. शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी ताक प्यावे.

तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, दोन जेवणाच्या दरम्यान ताकाचे सेवन करावे. सकाळी जेवणाआधी आणि संध्याकाळच्या जेवणाआधी ताकाचे सेवन करावे. याशिवाय दुपारच्या जेवणात तुम्ही ताकाचे सेवन करू शकता.

ताक पिणे हे व्यक्तीच्या शरीरावर अवलंबून असते. सामान्य व्यक्ती दिवसातून 200 ते 300 ग्रॅम म्हणजेच 1 ग्लास ताक सहज पिऊ शकते. पण वारंवार ताक प्यायल्यास सर्दी खोकला होण्याची शक्यता असते.

ताकामध्ये किसलेली काकडी, काळीमिरी पावडर, जिऱ्याची पावडर किंवा काळे मीठ मिक्स करून सुद्धा प्यायले जाते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात.

रात्रीच्या वेळी दही किंवा ताकाचे अजिबात सेवन करू नये. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. चुकीच्या वेळी ताकाचे सेवन केल्यास शरीरावर परिणाम दिसून येतात.






