फोटो सौजन्य: Gemini
Honda Civic Type R टेस्टिंग दरम्यान स्पॉट, भारतात केव्हा होणार लाँच?
Hyundai Exter ही भारतातील सर्वात कमी किंमतीत मिळणारी पेट्रोल SUV आहे, ज्याची सुरुवातीची किंमत जवळपास 5.49 लाख रुपये आहे. यात 1.2-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 82 bhp पॉवर आणि 113.8 Nm टॉर्क देते. यात मॅन्युअल आणि AMT असे दोन्ही गिअरबॉक्स दिले आहेत. Exter अंदाजे 19.4 kmpl मायलेज देते. या कारचे 185 mm ग्राउंड क्लिअरन्स खराब रस्त्यांवरही सहज चालण्यासाठी मदत करते. सेफ्टीसाठी Exter मध्ये 6 एअरबॅग्स, ESC, हिल-होल्ड आणि टायर प्रेशर सिस्टम मिळते. या एसयूव्हीच्या इंटिरिअरमध्ये 8-इंच स्क्रीन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, सनरूफ आणि क्रूज कंट्रोलने सुसज्ज आहे. ही SUV CNG व्हेरिएंटमध्येही उपलब्ध असून सुमारे 27 km/kg मायलेज देते.
नवीन वर्षात Mahindra XUV 7XO धुमाकूळ घालण्यास सज्ज! नवीन टिझर प्रदर्शित
Tata Punch ही भारतातील दुसरी सर्वात परवडणारी पेट्रोल SUV आहे, ज्याची किंमत अंदाजे 5.50 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार तिच्या स्ट्रेंथ आणि सेफ्टीसाठी ओळखली जाते, कारण तिला 5-स्टार GNCAP रेटिंग मिळाले आहे. तिचे 1.2-लीटर पेट्रोल इंजिन 87 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क तयार करते. यात मॅन्युअल आणि AMT दोन्ही गिअरबॉक्स मिळतात. Punch चे मायलेज सुमारे 20 kmpl पर्यंत आहे. 187 mm ग्राउंड क्लीयरन्स हलक्या ऑफ-रोड परिस्थितीतही या कारला चांगली स्थिरता देते. फीचर्समध्ये 10.25-इंच मोठी स्क्रीन, सनरूफ, पार्किंग सेन्सर्स, ड्युअल एअरबॅग्स आणि ESP मिळते. Punch च्या CNG मॉडेलमध्येही सुमारे 27 km/kg मायलेज मिळते.
Nissan Magnite ही देखील भारतातील स्वस्त पेट्रोल SUV पैकी एक आहे. जिची सुरुवातीची किंमत अंदाजे 5.62 लाख रुपये आहे. यात 1.0-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 71 bhp पॉवर आणि 96 Nm टॉर्क निर्माण करते. याशिवाय, यात Turbo Engine चा पर्यायही उपलब्ध आहे, जो अधिक ताकद प्रदान करतो. Magnite मॅन्युअल, AMT आणि CVT असे 3 गिअरबॉक्स पर्याय देते. ज्याचे मायलेज सुमारे 19.9 kmpl पर्यंत आहे. 205 mm ग्राउंड क्लीयरन्समुळे ही SUV खराब रस्त्यांवरही सहज चालते. फीचर्समध्ये 360-डिग्री कॅमेरा, 8-इंच स्क्रीन, वायरलेस Apple CarPlay, क्रूज कंट्रोल आणि 6 एअरबॅग्स मिळतात. तिचा CNG पर्यायही उपलब्ध असून तो सुमारे 24 km/kg मायलेज देतो.






