वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा पौष्टिक नाचणीच्या स्मूदीचे सेवन
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर अनेक प्रकारचे डाईट, तासनतास जीम इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र चुकीच्या पद्धतीने डाईट फॉलो केल्यास वाढलेले वजन आणखीनच वाढण्याची शक्यता असते. वाढलेले वजन नियंत्रणात आणले नाहीतर शरीरात लठ्ठपणा, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. अनेक लोक वाढलेले वजन कमी करताना सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र सकाळचा न केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला पोषण मिळते आणि संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये राहतो. वाढलेले वजन कमी करताना तुम्ही स्मूदी किंवा शेकचे सेवन करू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात नाचणीची स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा