आतड्यांमधील घाण मुळासकट स्वच्छ होण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते. खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी, अपुरी झोप, जंक फूडचे, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, शरीरातील विटामिनची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचे आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतात. सतत जंक फूडचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. शरीरातील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी पोटामध्ये अनेक आतड्यांमध्ये तशीच साचून राहते. ज्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. अपचन, गॅस, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवल्यानंतर कोणतंही काम करण्याची इच्छा निर्माण होत नाही. चुकीच्या जीवनशैलीमुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच संपूर्ण आरोग्य सुद्धा बिघडून जाते.(फोटो सौजन्य – iStock)
सांध्यांमधील लवचिकपणा वाढवण्यासाठी नियमित करा ‘या’ काळ्या दाण्यांचे सेवन, कोलेस्ट्रॉलची पातळी राहील नियंत्रणात
अनेकांना सतत बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. पण नेहमी नेहमी तेलकट तिखट पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोटात दुखणे, गॅस होणे, अपचन होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर आतड्यांमधील घाण बाहेर येण्याऐवजी पोटामध्ये तशीच साचून राहते. त्यामुळे दैनंदिन आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. अन्यथा पचनक्रिया बिघडून आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आहारात तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी फायबर युक्त अन्नपदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. फायबर युक्त अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे.
रोजच्या आहारात नियमित फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. संत्रे, पेरू, सफरचंद, आंबा, चिकू इत्यादी फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबर युक्त फळांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. फळांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. स्ट्रॉबेरीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि विटामिन आढळून येते.
मासिक पाळी, गर्भाशयाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ फुलाच्या चहाचे नियमित करा सेवन, वेदना होतील दूर
थंडीच्या दिवसांमध्ये हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात गाजर, कोबी, बीट, पालक, मेथी, मुळा इत्यादी भाज्यांचे सेवन करावे. या भाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात आणि पचनक्रिया सुधारते.