वाढत्या अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन
दैनंदिन आहारात बऱ्याचदा तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय काहींना लगेच अॅसिडिटीचा त्रास जाणवू लागतो. पोटात दुखणे, गॅस होणे, अॅसिडिटी वाढणे, आंबट ढेकर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध खाल्ली जातात. मात्र वारंवार गोळ्या औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात कोणत्याही तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी आहारात बदल करून शरीराची योग्य काळजी घ्यावी. आपल्यातील अनेकांना जेवल्यानंतर लगेच पचनाची समस्या, पोटात तयार होणारे वायू इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
अनियमित मासिक पाळी असू शकते गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण, तज्ज्ञांचा खुलासा
दुपारी किंवा रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना लगेच झोपण्याची सवय असते. पण जेवण केल्यानंतर लगेच झोपल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. कारण जेवलेले अन्नपदार्थ शरीरात पचन होत नाहीत. यामुळे आम्ल्पित्ता आणि इतर समस्या वाढू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली अॅसिडिटी कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतील. याशिवाय पोट फुगणे किंवा पोटात वाढलेली अॅसिडिटी नियंत्रणात राहील.
ओव्याचे बारीक दाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. ओवा खाल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय पोटात निर्माण झालेला गॅस कमी होऊन तात्काळ आराम मिळतो. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जातो. पोटासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही. ओव्यामध्ये थायमॉल नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरात वाढलेली अॅसिडिटी कमी होते. याशिवाय दाहक-विरोधी आणि उच्छ्वासविरोधी गुणधर्म पोटातील सर्व घाण बाहेर काढून टाकतात.
जेवण बनवताना जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्यामध्ये असलेले गुणधर्म पोटात वाढलेली उष्णता आणि गॅस कमी करण्यासाठी मदत करतो. याशिवाय यामध्ये असलेले थायमॉल आणि एंजाइम्सना उत्तेजित होण्यास मदत होते. आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर जिऱ्याचे पाणी प्यावे. जिऱ्याचे पाणी आतड्यांमधील घाण स्वच्छ करते. बद्धकोष्ठतेपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी जिऱ्याचे पाणी प्यावे. पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी जिऱ्याचे पाणी प्रभावी ठरते.
सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. योग गुरू स्वामी रामदेव यांनी देखील यावर सविस्तर माहिती दिली आहे. उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. याशिवाय वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.