गुटखा खाऊन दातांवर साचलेला किळसवाणा लाल पिवळा थर स्वच्छ करण्यासाठी वापरा 'या' झाडांचे देठ
संपूर्ण शरीराच्या स्वच्छतेसोबत दातांच्या स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. कारण दैनंदिन आहारात रोज वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात कधी तेलकट तिखट किंवा चिकट पदार्थ खाल्ले जातात. मात्र वारंवार गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे दातांचे आरोग्य खराब होण्याची शक्यता असते. दात खराब झाल्यानंतर किंवा दातांवर पिवळा आणि पांढरा थर साचून राहिल्यामुळे दात अस्वच्छ दिसू लागतात. तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे बऱ्याचदा सगळ्यांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. दातांवर वाढलेल्या पिवळेपणा दात खराब दिसू लागतात. टूथपेस्ट किंवा इतर कोणतेही पदार्थ वापरून दात स्वच्छ केले जातात.(फोटो सौजन्य – iStock)
दातांवर वाढलेल्या पिवळेपणामुळे दात अस्वच्छ वाटू लागतात. याशिवाय अनेकांना गुटखा आणि तंबाखू खाण्याची सवय असते. सतत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे दातांवर लाल आणि पिवळा थर तसाच साचून राहतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला खराब झालेले दात स्वच्छ करण्यासाठी कोणत्या झाडांच्या देठांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या झाडांचे देठ औषधी गुणधर्मांनी परिपुर्ण असतात. पूर्वीच्या काळी दात स्वच्छ करण्यासाठी झाडांच्या देठांचा वापर केला जात होता.
औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या कडुलिंबाच्या झाडाचे देठ दातांवर घासल्यास दात स्वच्छ होण्यास मदत होईल. यामध्ये असलेले गुणधर्म दातांवरील पिवळा थर कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय हिरड्याना आलेली सूज आणि कीड नष्ट करण्यासाठी कडुलिंबाच्या देठाचा वापर करावा. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म दात स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.
मिस्वाक झाडाचे नाव यापूर्वी कधीही ऐकले नसेल तर पण या झाडाच्या देठाचा वापर दात आणि हिरड्या स्वच्छ करण्यासाठी केला जातो. दातांवर साचलेला पिवळा थर, अस्वच्छ हिरड्या, लाल झालेले घाणेरडे दात इत्यादी समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मिस्वाकाच्या झाडाचे देठ वापरावे. यामुळे दात पांढरे शुभ्र आणि चमकदार दिसू लागतील.
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत ज्येष्ठमधाचा वापर औषधासाठी केला जात आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. घशात वाढलेली खवखव आणि इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जेष्ठमधाच्या काढ्याचे सेवन केले जाते. जेष्ठ मधाच्या देठाचा वापर करून तुम्ही दात स्वच्छ करू शकता.