Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण या गंभीर आजाराची लागण शरीराला होऊ नये म्हणून आहारात या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आतडे मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 27, 2026 | 08:06 AM
आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत

आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत

Follow Us
Follow Us:

आतड्यांचा कॅन्सर कशामुळे होतो?
कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी काय खावे?
कॅन्सर होण्याची कारणे?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मधुमेह, हार्ट अटॅक, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाखालील जमीनच सरकते. मागील वर्षभरात कोलन कॅन्सर हा सगळ्यात सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सरपैकी एक बनला आहे. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, आहारात वारंवार होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण तरुणांमध्ये झपाट्याने वाढताना दिसत आहे. पूर्वीच्या काळी हा आजार वयाच्या ६० व्या वर्षानंतर फार कमी लोकांमध्ये दिसून यायचा पण हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

७ महिन्यांच्या गरोदर महिलेच्या मेंदूतून काढला दुर्मिळ ट्यूमर; जसलोक हॉस्पिटलमध्ये कठीण शस्त्रक्रिया यशस्वी, माता-बाळ सुरक्षित

आतडे शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. खाल्लेले अन्नपदार्थ पचन करणे, शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकणे इत्यादी अनेक गोष्टी आतडे करते. त्यामुळे शरीर सक्रिय असणे फार आवश्यक आहे. आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने लक्षणे वाढू लागतात आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात या पदार्थांचा समावेश करावा. हे पदार्थ आतड्यांचे आरोग्य शांतपणे सुधारतात आणि शरीराला आजारांपासून वाचवतात.

आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून कोणते पदार्थ खावेत:

महाराष्ट्रीयन कडधान्ये:

दैनंदिन आहारात वेगवेगळ्या कडधान्यांचा आहारात समावेश करावा. मटकीची उसळ, पिठलं किंवा वरण-भात इत्यादी पदार्थ रोजच्या आहारात खावेत. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले सॅलड खाल्ल्यास पोट भरण्यासोबतच शरीराला आवश्यक असलेले पोषण मिळेल. रोज किमान १०० ग्रॅम कडधान्ये खाल्ल्यास कोलन कॅन्सरचा धोका २१ टक्क्यांनी कमी होतो. कडधान्य खाल्ल्यामुळे आतड्यांना सूज येत नाही. कुळीथ, मूग किंवा हरभऱ्याचा आहारात समावेश करावा.

दही किंवा थंडगार ताक:

दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दही किंवा ताकाचे सेवन करावे. जेवणानंतर दही खाणे ही एक परंपरा आहे. यामुळे शरीरात थंडावा कायम टिकून राहतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरिया वाढवण्यासाठी दही आणि आंबवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. दह्याच्या सेवनामुळे आतड्याची ‘बॅरियर फंक्शन’ सुधारते आणि विषारी घटक रक्तात मिक्स होत नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान भागवण्यासाठी नाहीतर आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ताक किंवा दही खावे.

Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरचे निदान म्हणजे शेवट नाही! सुरुवातीच्या टप्प्यातील कॅन्सरवर मात करण्याचे ५ प्रभावी मार्ग

लसूण:

कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी लसूण फार उपयोगी आहे. सकाळी उठल्यानंतर नियमित एक लसूण पाकळी कच्ची चावून खाल्ल्यास कॅन्सरच्या पेशी नष्ट होण्यास मदत होईल. याशिवाय शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. लसूण खाल्ल्याने आतड्यातील हानिकारक जीवाणूंची वाढ थांबते, ज्यामुळे संसर्गाचा धोका टाळतो. त्यामुळे नियमित तुपात भाजलेली किंवा मधात मिक्स केलेली लसूण खावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आतड्यांचा कॅन्सर म्हणजे काय?

    Ans: मोठ्या आतड्यात (कोलन) किंवा मलाशयात पेशींची अनियंत्रित वाढ झाल्यास आतड्यांचा कॅन्सर होऊ शकतो. वेळेवर तपासणी आणि योग्य जीवनशैलीमुळे धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.

  • Que: आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका कोणत्या कारणांनी वाढू शकतो?

    Ans: कमी फायबरयुक्त आहार, प्रक्रिया केलेले मांस, असंतुलित जीवनशैली, वाढते वय, कौटुंबिक इतिहास आणि काही आरोग्य समस्या यामुळे धोका वाढू शकतो.

  • Que: आतड्यांच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती असू शकतात?

    Ans: शौचाच्या सवयींमध्ये बदल, सतत बद्धकोष्ठता किंवा जुलाब, पोटदुखी, शौचातून रक्त येणे, कारण नसताना वजन कमी होणे आणि सतत थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

Web Title: Consume these foods to prevent bowel cancer your intestines will become strong foods for colon cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • Cancer Awareness
  • cancer risks
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
2

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
4

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.