Corn Cutlet Recipe: तुम्हालाही संध्याकाळच्या नाश्त्याला काहीतरी झटपट आणि चटपटीत बनवायचे असेल तर ही कुरकुरीत कॉर्न कटलेट रेसिपी नक्की ट्राय करा.
Follow Us:
Follow Us:
विस्तार
स्वीट कॉर्न आणि बटाट्यापासून झटपट कटलेट
चहासोबत खमंग आणि कुरकुरीत स्नॅक
मुलांच्या डब्यासाठीही उत्तम पर्याय
संध्याकाळी चहाचा कप हातात आला की सोबत काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होतेच. पण रोज बिस्किट, पोहे किंवा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर यावेळी काहीतरी वेगळं करून पाहा. घरात स्वीट कॉर्न आणि बटाटे असतील तर काही खास साहित्याची गरज नाही. याच पदार्थांपासून तुम्ही स्वादिष्ट, कुरकुरीत आणि अगदी सहज तयार होणारे कॉर्न कटलेट बनवू शकता. मुलांच्या डब्यासाठी किंवा पाहुण्यांसाठीही हा झटपट स्नॅक उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर , जाणून घेऊया कुरकुरीत कॉर्न कटलेटची सोपी रेसिपी.
सर्वप्रथम स्वीट कॉर्न उकडून घ्या. त्यातील अतिरिक्त पाणी काढून कॉर्न मिक्सरमध्ये अगदी बारीक न करता जाडसर वाटून घ्या. यामुळे कटलेटला छान टेक्सचर मिळेल. एका भांड्यात वाटलेले कॉर्न आणि मॅश केलेले उकडलेले बटाटे घ्या. त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा. आता त्यात ब्रेडक्रम्ब्स घालून पुन्हा मिश्रण मळून घ्या. मिश्रण खूप ओलसर वाटत असल्यास थोडे अधिक ब्रेडक्रम्ब्स घालू शकता. तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून हाताने चपट्या कटलेटचा आकार द्या.कढईत तेल गरम करून कटलेट मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत झाल्यावर ते टिश्यू पेपरवर काढा.गरमागरम कॉर्न कटलेट हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या डिपसोबत सर्व्ह करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असल्याने हा स्नॅक चहासोबत आणखी छान लागतील.
टीप: कटलेट तळण्यापूर्वी काही मिनिटे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते तुटण्याची शक्यता कमी होऊ शकते आणि आकारही व्यवस्थित राहतो.