Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स
ही सफारी विद्यार्थ्यांसाठी वर्गाच्या पलीकडे जाऊन मुंबईचा अनुभव घेण्यासाठी आणि शहर व देशाला आकार देणाऱ्या जागांशी व कथांशी जोडले जाण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती. सिटीफ्लो बसच्या आरामदायी प्रवासातून विद्यार्थ्यांनी गेटवे ऑफ इंडिया, मणी भवन आणि ऑगस्ट क्रांती मैदान, तसेच सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट गॅलरीला भेट दिली आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मारकाच्या जागेवरूनही प्रवास केला. या प्रवासात पॅराडॉक्स म्युझियमला देखील भेट देण्यात आली, ज्यामुळे या सफारीमध्ये आधुनिक आणि अनुभवात्मक दृष्टिकोन मिळाला.
सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास स्वतःच्या लेन्सद्वारे मुंबई शहराला टिपण्याची एक संधी बनला. विद्यार्थ्यांनी या सफारीदरम्यान प्रमुख ठिकाण, वास्तुकला आणि खास क्षणांचे फोटो कॅप्चर केले, ज्यातून शहराबद्दलचा त्यांचा वैयक्तिक दृष्टिकोन समोर आला. त्यांनी कॅप्चर केलेले निवडक फोटो सिटीफ्लोच्या प्लॅटफॉर्म्सवरून शहरभर प्रदर्शित केली जातील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा मुंबईबाबत दृष्टिकोन अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.
या उपक्रमामध्ये सिटीफ्लोचे सामायिक व शाश्वत नागरी वाहतुकीवरील लक्ष आणि सलाम बॉम्बे फाउंडेशनचे माध्यम, कला, क्रीडा व व्यावसायिक कौशल्य विकासातील शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुलांना गरीबीच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी सक्षम करण्याचे कार्य एकत्र पाहायला मिळाले. सिटीफ्लो दैनंदिन नागरी प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी आणि सामायिक वाहतुकीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे, तर सलाम बॉम्बे फाउंडेशन विद्यार्थ्यांना कौशल्य, आत्मविश्वास आणि सर्जनशील अभिव्यक्ती विकसित करण्यासाठी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून देते.
सिटीफ्लोचे सह-संस्थापक, सीएमओ आणि हेड ऑफ सिटीफ्लो कॉर्पोरेट संकल्प केळशीकर म्हणाले, “सिटीफ्लोमध्ये आमचा विश्वास आहे की, शहरामधील वर्दळीचा थेट संबंध ते कसे विकसित होते याच्याशी असतो. अधिक सुलभ, शाश्वत आणि राहण्यायोग्य शहरे उभारण्याची आमची कटिबद्धता केवळ वाहतुकीपुरती मर्यादित नाही, तर आम्ही ज्या समुदायांना सेवा देतो त्यांच्या जीवनात मोलाची भर घालणारे अनुभव निर्माण करणे हाही त्यामागील उद्देश आहे. सलाम बॉम्बे फाउंडेशनसोबत सहयोगामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना त्यांचे शहर अनुभवण्याची, शहराच्या इतिहासाशी जोडले जाण्याची आणि शहराच्या भविष्याची कल्पना करण्याची संधी देता आली. त्यांनी फोटो कॅप्चर करण्याच्या माध्यमातून हा प्रवास टिपताना पाहण्याचा अनुभव अधिक अर्थपूर्ण करणारा ठरला आणि त्यांच्या या दृष्टिकोनाचा मुंबईभर प्रचार केला जात राहिल, अशी आम्हाला आशा आहे.”
सलाम बॉम्बे फाउंडेशनचे कम्युनिकेशन्स प्रमुख सॅविओ पाशाणा म्हणाले, “तरुण पिढीला शोध घेण्याची, निरीक्षण करण्याची आणि स्वतःला व्यक्त करण्याची संधी दिली जाते, तेव्हा शिक्षण कुठेही घडू शकते. या शैक्षणिक सफारीने आमच्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाशी जुडले जाण्याची, तसेच एका आधुनिक दृष्टिकोनातून शहराचे निरीक्षण करण्याची अमूल्य संधी उपलब्ध करून दिली. सिटीफ्लो बसेसमध्ये आपले काम प्रदर्शित केले जाण्याची ही संधी आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्थपूर्ण प्लॅटफॉर्म प्रदान करते. आम्हाला शिक्षण, सर्जनशीलता आणि व्यावसायिक संधी एकत्र आणणाऱ्या या स्वातंत्र्यदिन अनुभवाची रचना करण्यासाठी सिटीफ्लोसोबत सहयोग करताना आनंद होत आहे.”हा सहयोग सामायिक विश्वासाला अधोरेखित करतो की, शहरातून प्रवास केल्यानंतर शहराबाबत सर्वोत्तमपणे समजते आणि दैनंदिन प्रवास तरुणांच्या कथा पुन्हा शहरापर्यंत पोहोचवू शकतो.