Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं

गट हेल्थचा थेट संबंध आपल्या पचनक्रियेशी असतो. रोजच्या धावपळीत नकळत केल्या जाणाऱ्या काही सवयींमुळे गट हेल्थ बिघडू शकते आणि पोटदुखी, बद्धकोष्ठता, छातीत जळजळ यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 26, 2026 | 08:15 PM
पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या 'या' रोजच्या सवयीच बिघडवतायत 'गट हेल्थ'; पाहा काय टाळावं

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या 'या' रोजच्या सवयीच बिघडवतायत 'गट हेल्थ'; पाहा काय टाळावं

Follow Us
Follow Us:
  • दैनंदिन सवयींचा आरोग्यावर परिणाम
  • पचनक्रियेशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता
  • वेळीच लक्ष देऊन सवयींमध्ये बदल करणे गरजेचे
गट हेल्थ जर खराब असेल तर याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होत असतो. पचनक्रियेतील समस्येमुळे पोट साफ होत नाही आणि परिणामी आपला दिवस खराब होतो. यामुळे पोटदुखी, जडपणा, छातीत जळजळ, ढेकर येणे, बद्धकोष्ठता आणि मळमळ अशा समस्या जाणवू लागतात. याचा आपल्या ओव्हरऑल हेल्थवर वाईट परिणाम होऊ लागतो. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शरीरातील अनेक प्रक्रिया आपल्या गट हेल्थवर अवलंबून असतात, अशात जर गट हेल्थ खराब झाली तर हळूहळू आरोग्याच्या लहान-सहान समस्या जाणवू लागतात.

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी

अनेकांना हे ठाऊक नाही पण आपल्या शरीरातील अधिकतर समस्या या आपल्या रोजच्या चुकांमुळे किंवा चुकीच्या सवयींमुळे उद्भवत असतात. या चुका हळूहळू आपल्या शरीरावर परिणाम करु लागतात आणि पुढे जाऊन गंभीर समस्या निर्माण करतात. तुम्हालाही पचनाच्या समस्या असतील तर गट हेल्थवर लक्ष देणे गरजेचे आहे. चला नेहमीच्या कोणत्या सवयी ज्या गट हेल्थवर परिणाम करु शकतात ते जाणून घेऊया.

प्रोसेस्ड फूडचे सेवन

आपल्या रोजच्या दिनचर्येत अनेकजण प्रोसेस्ड फूडचे सेवन करतात. कामाचा ताण आणि वेळ वाचवण्यासाठी तसेच आळसापोटी अधिकतर लोक जेवण बनवत नाही तर प्रोसेस्ड फूडवर अवलंबून राहतात. यात मॅगी नूडल्सचाही समावेश होतो. तुम्ही जर रोजच्या जीवनात प्रोसेस्ड फूडचे सेवन करत असाल तर आजच ही सवय टाळा. यात अनहेल्दी फॅट्स, साखरेचे जास्त प्रमाण आणि प्रिजर्व्हिटीज असतात जे आपल्या आतड्यांना त्रास देतात. यामुळे गट हेल्थला नुकसान पोहचत असते.

कमी पाणी पिणे

आपल्या सर्वांना माहिती आहे की, पाणी आपल्या आरोग्यासाठी किती गरजेचे आहे. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यात पाण्याची मोठी मदत होत असते. पाणी तुमच्या ओव्हरऑल बाॅडीला हेल्दी ठेवण्यास मदत करत असते. पोषक तत्वांचे शोषण आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाणी कमी पिल्याने शाैचास समस्या निर्माण होतात आणि याचा आतड्यांवर परिणाम होऊ लागतो. यामुळे तुमची पचनक्रियाही बिघडू शकते.

नाश्ता स्किप करणे

आधुनिक जीवनशैलीत अनेकांनी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये काही बदल केले आहेत. बरेच लोक कामाच्या गडबडीत सकाळचा नाश्ता स्किप करतात आणि रात्रीचे जेवण फार उशीराने करतात. जेवणाची वेळ देखील निरोगी आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. वेळेवर न खाणे किंवा कोणत्याही वेळी जेवण टाळणे, या दोन्ही सवयींमुळे एन्झाइमच्या स्रावावर आणि आम्ल निर्मितीवर परिणाम होतो. यामुळे पचनक्रिया खराब होते आणि आतड्यांना त्रास होऊ लागतो.

पाळीव प्राण्याचे अन्नपदार्थ बदलताना ‘या’ सोप्या आणि सुरक्षित पद्धतींचा करा अवलंब, प्राण्यांचे आरोग्य राहील निरोगी

रात्री उशीरापर्यंत जागे राहणे

रात्रीच्या वेळी जर तुम्हाला उशीरापर्यंत जागे राहण्याची सवय असेल तर ही सवय देखील तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असते हे लक्षात घ्या. अनेकदा लोक मध्यरात्रीपर्यंत जागे राहतात ज्यामुळे पचनावरच नाही स्किनवरही याचा वाईट परिणाम दिसू लागतो. यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात, स्ट्रेस लेव्हलमध्ये वाढ होते आणि गट हेल्थलाही नुकसान पोहचते.

Web Title: Daily habits that damage gut health and affect digestion lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • digestion
  • gut health
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

पेरू खाताना मधुमेहाच्या रुग्णांनी करू नका या चुका
1

पेरू खाताना मधुमेहाच्या रुग्णांनी करू नका या चुका

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी
2

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी

Health Tips: फक्त चवीसाठीच नाही! वजन कमी करण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत, वेलचीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
3

Health Tips: फक्त चवीसाठीच नाही! वजन कमी करण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत, वेलचीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत
4

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.