भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी
लग्नाच्या पहिल्या वर्षी चुकूनही करु नका ‘या’ चुका, वैवाहिक नातं बिघडून नात्यात येऊ शकतो दुरावा
प्लास्टर निघण्याचे कारण काय?
भिंतीवरील प्लास्टर निघण्याची अनेक कारणे असू शकतात. सर्वात सामान्य कारण म्हणजे, पावासाळ्यात वाढणारा ओलावा. भिंतींमधून होणारी पाण्याची गळती, पाईप किंवा छतामधील गळती, आणि बाथरूम किंवा स्वयंपाकघरातील अतिरिक्त आर्द्रता या सर्वांमुळे भिंतीमध्ये ओलावा शिरू शकतो. जेव्हा हा ओलावा रंग आणि प्लास्टरखाली अडकतो तेव्हा दोन्हींमधील बंध कमकुवत होऊ लागतात. यानंतर लेअर फुगायला, निघायला आणि भिंतीपासून वेगळा व्हायला सुरुवात होते.
भिंतीला नवीन पेंट लावण्याआधी जर भिंतीची नीट साफसफाई, सँडिंग किंवा प्राइमिंग केली नाही तर नवीन रंग भिंतीवर नीट लागत नाही. धूळ. ग्रीस आणि जुना अर्धा निघालेला पेंट नव्या पेंटला कमकुवत बनवतो. भिंतीवर जुना पेंट अर्धवट असल्याने यावर नवा योग्य नीट बसत नाही ज्यामुळे भिंतीवर ओबड-धोबड, जाडसर पेंटचा थर दिसू लागतो. यामुळे होतं असं की, नवा पेंट लावूनही भिंतीवर तो नीट लागत नाही आणि नवा पेंट देखील लवकर खराब होऊ लागतो. यामुळेच नवा पेंट लावण्याआधी जुना पेंट नीट घासून पूर्णपणे काढा. मग त्यावर प्राइमर लावा यामुळे नवा रंग भिंतीवर चांगल्या रितीने बसतो. जर भिंत जास्त ओलाव्याच्या ठिकाणी असेल जिथून ती खराब होण्याची शक्यता आहे तर अशावेळी वाॅटर प्रुफ पेंटचा वापर करणे अधिक फायद्याचे ठरेल.
भिंतीवरील या संकेतांकडे विशेष लक्ष द्या
भिंत खराब होण्याआधी सुरुवातीलाच त्यावर काही संकेत दिसू लागतात. पेंटच्या आतमध्ये लहान बुडबुडे, प्लास्टरमध्ये बारीक भेगा पडणे, भिंतीवर ओलावा किंवा रंगात बदल झाल्याची चिन्हे आणि कुबट वास येणे अशी लक्षणे दिसून येत असतील तर लक्षात घ्या की भिंत खराब होत आहे. अशा परिस्थितीत भिंतीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.






