Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागडे स्किन केअर वापरून त्वचा खराब झाली आहे? मग ‘या’ पद्धतीने घरीच करा टोमॅटो फेशिअल, डेड स्किन होईल गायब

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी टोमॅटो फेशिअल करावे. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा अधिक सुंदर दिसते. चला तर जाणून घेऊया टोमॅटो फेशिअल करण्याची सोपी पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 07, 2026 | 02:30 PM
महागडे स्किन केअर वापरून त्वचा खराब झाली आहे? मग 'या' पद्धतीने घरीच करा टोमॅटो फेशिअल

महागडे स्किन केअर वापरून त्वचा खराब झाली आहे? मग 'या' पद्धतीने घरीच करा टोमॅटो फेशिअल

Follow Us
Follow Us:

चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी हल्ली सर्वच महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ब्युटी क्रीम, सीरम आणि विविध स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कधी चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या अतिशय महागड्या स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. बोटॉक्स, स्किन फिलर इत्यादी ट्रीटमेंट केल्यामुळे काहीकाळापुरती त्वचा अतिशय देखणी आणि सुंदर दिसते. पण कालांतराने चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स, ऍक्ने आणि सुरकुत्या येऊन त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी महागड्या स्किन ट्रीटमेंट, स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती आणि नॅचरल उपचार करावेत. यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा खूप जास्त सुंदर दिसते.(फोटो सौजन्य – istock)

पोटात साचून राहिलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? आरशासारख्या नितळ त्वचेसाठी करून पहा ‘हे’ प्रभावी उपाय

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी महिला फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतात. पण याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. २ किंवा ३ दिवस फेशिअल ग्लो टिकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टोमॅटो फेशिअल करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध असलेले टोमॅटो त्वचा हायड्रेट आणि ग्लोइंग ठेवण्यास मदत करतात. टोमॅटोच्या वापरामुळे त्वचेवर वाढलेला टॅन कमी होऊन त्वचा सुंदर आणि उजळदार दिसते. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा, डाग आणि निस्तेजपणा कमी करण्यास मदत करते. चला तर जाणून घेऊया टोमॅटो फेशिअल करण्याची सोपी पद्धत.

टोमॅटो फेशिअल करण्याची सोपी पद्धत:

फेशिअल करताना सगळ्यात आधी त्वचा स्वच्छ करून घ्यावी. यासाठी वाटीमध्ये दूध घेऊन त्यात टोमॅटोचा रस घालून मिश्रण मिक्स करा. तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा.यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण, चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर त्वचा पाण्याने किंवा कापसाच्या मदतीने स्वच्छ करून घ्या. त्वचा आतून खोलवर स्वच्छ करण्यासाठी किल्नझिंग करणे आवश्यक आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी फेस स्क्रब करावे. फेस स्क्रब केल्यामुळे डेड स्किन नष्ट होते. यासाठी टोमॅटोचे दोन भाग करून एका तुकड्यावर कॉफी पावडर टाकून हलक्या हाताने संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा. मसाज करताना त्वचा खूप जास्त घासू नये. यामुळे त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी स्क्रबिंग करणे आवश्यक आहे.

Skin Pigmentation: चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनमुळे त्रस्त आहात? ‘हे’ घरगुती उपाय करा ट्राय, त्वचा उजळेल

फेस मसाज करताना सगळ्यात आधी वाटीमध्ये एलोवेरा जेल, टोमॅटोचा रस, आणि मध मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. मसाज केल्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. मसाज करून झाल्यानंतर चेहऱ्यावर फेसपॅक लावावा. वाटीमध्ये मुलतानी माती, टोमॅटोचा रस, कॉफी पावडर घालून फेसपॅक तयार करा. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवून द्या आणि नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Damaged skin from using expensive skin care then do tomato facial at home using this method home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
1

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार
2

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
3

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
4

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.