Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kaju Masala: घरच्या घरी बनवा ढाबा स्टाइल काजू मसाला; चव अशी की सगळेच म्हणतील ‘वाह!’ रेसिपी नोट करा

Kaju Masala Recipe: जर तुम्हालाही रोजच्या भाज्या खाऊन कंटाळ आला, तर ही ढाबा स्टाईल काजू मसाला रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 08, 2026 | 10:00 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • ढाबा स्टाइल काजू मसाला
  • रेसिपी नोट करा
  • काजू मसाला बनवताना लक्षात ठेवा या गोष्टी
रोजच्या जेवणात त्याच-त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला आहे का? किंवा वीकेंडला कुटुंबासाठी काहीतरी खास, चटपटीत आणि रेस्टॉरंटसारखे बनवायचे असेल, तर ढाबा स्टाइल काजू मसाला नक्की ट्राय करा. काजूचा कुरकुरीतपणा, मसालेदार आणि क्रीमी ग्रेव्ही यामुळे ही भाजी जेवणाची रंगत वाढवते. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी फारसे साहित्यही लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी ढाबा स्टाइल काजू मसाला बनवण्याची सोपी पद्धत.

Hair Care: केस होतील घनदाट, मजबूत आणि चमकदार? आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

काजू मसाल्यासाठी लागणारे साहित्य

  • १ कप – काजू
  • २ ते ३ टोमॅटो
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • १ ते २ हिरवी मिरची
  • १८ ते २० काजू पावडर
  • १ चमचा लाल तिखट
  • ½ चमचा गरम मसाला
  • १ चमचा कसुरी मेथी
  • २ चमचे क्रीम
  • तमालपत्र
  • २ ते ३ चमचे लोणी किंवा तूप
  • मीठ
  • पाणी

अशी बनवा ढाबा स्टाइल काजू मसाला

सर्वप्रथम कढईत १ चमचा लोणी किंवा तूप गरम करा. यामध्ये काजू घालून मंद आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. काजू जळणार नाहीत याची काळजी घ्या. भाजलेले काजू प्लेटमध्ये काढून घ्या. त्याच कढईत थोडे लोणी घालून तमालपत्र आणि चिरलेले टोमॅटो परतून घ्या. टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्याची बारीक प्युरी करून घ्या. आता कढईत लोणी गरम करून आले-लसूण पेस्ट परता. त्यात काजूची बारीक पावडर घालून काही वेळ मंद आचेवर भाजा. त्यानंतर टोमॅटो प्युरी, लाल तिखट, हिरवी मिरची आणि थोडे पाणी घाला. ग्रेव्हीला चांगली उकळी आल्यानंतर त्यात भाजलेले काजू आणि मीठ घालून मिक्स करा. काही मिनिटे शिजू द्या. त्यानंतर गरम मसाला, कसुरी मेथी आणि क्रीम घालून व्यवस्थित मिसळा. यानंतर, ग्रेव्हीला एक-दोन मिनिटे मंद आचेवर शिजू द्या आणि गॅस बंद करा. तयार आहे तुमचा स्वादिष्ट ढाबा स्टाइल काजू मसाला.

काजू मसाला बनवताना लक्षात ठेवा या गोष्टी

काजू नेहमी मंद आचेवर भाजा, त्यामुळे ते करपणार नाहीत.

ग्रेव्ही अधिक क्रीमी हवी असल्यास काजू पावडरचे प्रमाण थोडे वाढवू शकता.

क्रीम शेवटी घातल्यास ग्रेव्हीचा टेक्सचर अधिक छान राहतो.

ढाब्यासारखा स्वाद मिळवण्यासाठी सर्व मसाले घातल्यानंतर भाजी काही मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.

ही भाजी नान, रोटी, तंदुरी रोटी, पराठा किंवा जीरा राईससोबत गरमागरम सर्व्ह करा.

Iodine Deficiency: आयोडीनची कमतरता ठरू शकते धोकादायक! शरीरावर होतात ‘हे’ गंभीर परिणाम

Web Title: Dhaba style kaju masala easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • best recipe
  • easy food recipes
  • Maharashtrian Recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.