Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळाच्या दिवसांमध्ये पचनास हलके असलेले पदार्थ बनवावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दक्षिण भारतात बनवला जाणारा लेमन राईस बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2026 | 10:52 AM
५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस

५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर रोजच्या आहारात सहज पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन केले जाते. तिखट, तेलकट पदार्थ खाल्ले जात नाही. त्यामुळे दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या वेळी स्वयंपाक काय बनवावं सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंबट तिखट लेमन राईस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. दक्षिण भारतात भाताचे विविध प्रकार बनवून खाल्लेले जातात. कमीत कमी साहित्य आणि कमी वेळात तयार होणारा पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. तामिळनाडूमध्ये एलुमिचाई साधम, कर्नाटक मध्ये चित्रान्न, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मध्ये निम्मकाया पुलिहोरा इत्यादी वेगवेगळ्या नावाने लेमन राईस ओळखला जातो. हा राईस तुम्ही दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता. कमी साहित्याचा वापर करून बनवलेले पदार्थ खायला आणि बनवायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लेमन राईस खाल्ल्यास पचनक्रिया चांगली राहील आणि शरीराला सुद्धा फायदे होतील. चला तर जाणून घेऊया लेमन राईस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : शाही, सुगंधित चवीचा ‘बगारा राईस’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा

साहित्य:

  • शिजवलेला पांढरा भात
  • लिंबू
  • शेंगदाणे
  • तेल
  • चणाडाळ
  • उडीद डाळ
  • कढीपत्त्याची पाने
  • काजू
  • मोहरी
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • लाल सुकी मिरची
साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • लेमन राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये किंवा टोपात जास्त पाणी न घालता सुटसुटीत भात शिजवून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर त्यात काजू टाकून लालसर होईपर्यंत भाजा. भाजलेले काजू आणि शेंगदाणे काढून घ्या.
  • त्यानंतर गरम तेलात मोहरी, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने, उडीद डाळ, चणा डाळ आणि हिरव्या मिरच्या घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात भाजलेले काजू आणि शेंगदाणे घालून मिक्स करा. फोडणी खमंग भाजल्यानंतर त्यात हळद घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या फोडणीमध्ये भात टाकून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आंबट तिखट चवीचा लेमन राईस.

Web Title: Digestion will remain active in summer make sour tangy lemon rice in 5 minutes note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.