२००९: स्वीडनमध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला.
१९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.
१९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
१९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.
१९७८: जपानचे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.
१९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
१९६१: क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्यूबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या.
१९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९४०: युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.
१९३०: सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
१९२७: जागतिक कामगार दिन – जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
१८९७: रामकृष्ण मिशन – स्वामी विवेकानंद यांनी सुरूवात केली.
१८९०: जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
१८८६: आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसऱ्या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.
१८८४: अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा.
१८८२: आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे स्थापना झाली.
१८४४: हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.
१८४०: द पेनी ब्लॅक हे पहिले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले.
१७३९: चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.
१९७१: अजित कुमार – भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर
१९४४: सुरेश कलमाडी – केंद्रीय मंत्री आणि आमदार
१९४३: सोनल मानसिंह – नृत्यांगना
१९३२: एस. एम. कृष्णा – कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री
१९१९: मन्ना डे – पार्श्वगायक (निधन: २४ ऑक्टोबर २०१३)
१९१५: अंचल – भारतीय हिंदी साहित्यिक (निधन: १३ ऑक्टोबर १९९५)
१८६४: ऍना जर्व्हिस – मदर्स डे च्या संस्थापिका (निधन: २४ नोव्हेंबर १९४८)
१२१८: रुडॉल्फ (पहिला) – जर्मनीचा राजा (निधन: १५ जुलै १२९१)
१९२२: मधु लिमये – समाजवादी विचारवंत (निधन: ८ जानेवारी १९९५)
१९९३: ना. ग. गोरे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (जन्म: १५ जून १९०७)
१९७२: कमलनयन बजाज – भारतीय उद्योगपती (जन्म: २३ जानेवारी १९१५)
१९५८: नाना जोग – नाटककार गणेश शिवराम उर्फ
१९४५: जोसेफ गोबेल्स – जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते (जन्म: २९ ऑक्टोबर १८९७)






