पुरंदर किल्ल्यावर दिलेर खानविरोधात लढताना वीरमरण आलेले मुरारजी देशपांडे पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारे अनेक पराक्रमी योद्धा होते. त्यापैकी एक म्हणजे मुरारजी देशपांडे. पुरंदरावर त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी प्राणांची आहुती दिली. मोगल सरदार दिलेर खान याच्याविरुद्ध झालेल्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. मात्र आजच्या दिवशी 1665 साली त्यांना वीरमरण आले. १६६५ साली मोगलांनी पुरंदर किल्ल्यावर जोरदार हल्ला चढवला. या वेळी मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या मावळ्यांसह शत्रूवर तुटून पडत प्रखर प्रतिकार केला. संख्येने कमी असूनही त्यांनी मोगल सैन्याला चांगलाच धक्का दिला. त्यांच्या धैर्याने शत्रूही थक्क झाला होता. युद्धाच्या निर्णायक क्षणी दिलेरखानाने मुरारबाजींना शरण येण्याचा प्रस्ताव दिला, मात्र त्यांनी तो ठामपणे नाकारत स्वराज्यासाठी लढत राहण्याचा निर्णय घेतला. अखेर लढता लढता ते धारातीर्थी पडले. आजही त्यांचे बलिदान हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. (Dinvishesh)
30 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
30 मार्च रोजी जन्म दिनविशेष






