राजस्थान रॉयल्सचा चेन्नईवर विजय
वैभव सूर्यवंशीने केली वादळी अर्धशतकी खेळी
आरआरच्या गोलंदाजांनी चेन्नईचा विजयी रथ रोखला
Tata IPL 2025 CSK vs RR Live: आज आसाम येथील बरसपारा येथे क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा (CSK vs RR) तिसरा सामना पार पडला. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीपुढे चेन्नईचे फलंदाज ढेपाळले. तर राजस्थाने चेन्नईवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. वैभव सूर्यवंशीने अर्धशतकी खेळी केली.
राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार रियान परागने 14 धावा करून संघाला विजय प्राप्त करून दिला. यशस्वी जयस्वालने नाबाद 38 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने आज गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चांगला खेळ केल्याचे पाहायला मिळाले. ओपनिंग जोडीने चांगली सुरुवात करून दिल्याने विजेचा मार्ग मोकळा झाला. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केली.
चेन्नईच्या संघाची आकडेवारी
चेन्नई सुपर किंग्सकडून प्रथम संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड खेळण्यासाठी उतरले. संजू सॅमसन केवळ 6 धावा करून बाद झाला. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील 6 धावा करून बाद झाला. तसेच युवा फलंदाज आयुष म्हात्रे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर मॅथ्यू शॉर्ट केवळ 2 धावा करून बाद झाला. तर सरफराज खानने 12 चेंडूत 17 धावा कडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील 17 धावा करून बाद झाला. कार्तिक शर्माने 18 धावा केल्या. शिवम दुबेने आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. मात्र चौथ्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नांत बाद झाला. मॅट हेनरी केवळ 5 धावा करून बाद झाला.
Match No. 3: WICKET! Over: 6.2 Vaibhav Suryavanshi 52(17) ct Sarfaraz Khan b Anshul Kamboj, Rajasthan Royals 75/1
https://t.co/UzbuFk5G26 #TATAIPL | #RRvCSK — IndianPremierLeague (@IPL) March 30, 2026
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, मॅथ्यू शॉर्ट, शिवम दुबे, प्रशांत वीरजेमी ओव्हरटन, नूर अहमद, खलील अहमद, मॅट हेन्री, अंशुल कंबोज, राहुल चहर, श्रेयस गोपाल, सरफराज खान, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, अकील हुसैन, झॅक फॉल्क्स, कार्तिक शर्मा, अमन खान, उर्विल पटेल, देवाल्ड ब्रेव्हिस (दुखापतग्रस्त), एमएस धोनी (दुखापतग्रस्त).
CSK चा मोठा ‘गेम’! ‘यलो आर्मी’ला मोठा धक्का; संजू अन् ऋतुराजचा RR विरुद्ध फ्लॉप शो
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, ॲडम मिल्ने, शुभम दुबे, डोनोव्हन फरेरा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी सिंग, युधवीर सिंग चरक, नांद्रे बर्गर, अमन राव पेराला






