प्रौढ व्यक्तींना वार्षिक लसीची गरज आहे का?
यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात अनपेक्षितपणे पाऊस पडला. भारताने 1901 पासूनचा सर्वात मुसळधार पाऊस पाहिला. मोसमी हवामान म्हणजे खरोखरीच एखाद्या रोलसकोस्टरसारखे वागू शकते.घटकेत आकाश ढगांनी भरून जाते, थंड वारे वाहू लागतात आणि घटकेत प्रखर ऊन पडते. तापमानात हे अचानक होणारे बदल, त्याजोडीला वाढता दमटपणा यांचा तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम होऊ शकतो आणि त्यातून फ्लूसारखे मोसमी विषाणू अधिक सहजपणे फैलावू शकतात.(फोटो सौजन्य – istock)
भारतासारख्या उष्णकटिंबधात येणा-या देशांत या कालावधीमध्ये फ्लू (किंवा इन्फ्लुएन्झा) वारंवार होण्याचे प्रमाण खूप जास्त असते. A(H1N1), A(H3N2), आणि इन्फ्लुएन्झा B सारखे फ्लूच्या विषाणूंना उसंत नसते – ते वर्षभर संक्रमित होत असतात. म्हणूनच वर्षातून एकदा फ्लूचे इंजेक्शन घेणे हा सुरक्षित राहण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. मग ऋतू कोणतीही असो.
असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी व व्होरा क्लिनिक, मुंबईचे मेडिकल डायरेक्टर डॉ. अगम व्होरा यांच्यामते, “अनेक लोक फ्लू आणि नेहमीची सर्दी यांच्यामध्ये गोंधळतात. पण फ्लू हा सर्दीपेक्षा बराच गंभीर आजार आहे. दोन्हींमध्ये घसा बसणे किंवा खोकला यांसारखी समान लक्षणे दिसत असली तरीही, फ्लूमध्ये बरेचदा खूप ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि मळमळणे यांसारखी लक्षणेही जाणवतात4. ही लक्षणे लवकरात लवकर ओळखल्यास लवकर बरे होण्यास आणि गुंतागूंती टाळण्यास मदत होऊ शकते. आणि फ्लूचा विषाणू दरवर्षी बदलत राहत असल्याने, लसीमध्येही नियमितपणे सुधारणा केली जात असते – तेव्हा वर्षातून एकदा फ्लूचे इंजेक्शन घेणे हा सुरक्षित राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.5”
तुम्ही प्रवासात असाल तेव्हा साबण व पाण्याने आपले हात वरचेवर धुवा किंवा हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करा. आपल्या चेह-याला – विशेषत: आपले डोळे, नाक किंवा तोंडांला शक्यतो हात लावू नका आणि तुमचा फोन किंवा दरवाज्याचा नॉब अशा ज्या-ज्या गोष्टींना तुमचा वारंवार हात लागतो त्यांना स्वच्छ ठेवण्यास विसरू नका.
ज्यांची तब्येत बरी नाही अशा व्यक्तींपासून अंतर राखण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तेव्हा खिडक्या उघडून ताजी हवा आत येऊ द्या आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घालून जायला विसरू नका.
तुम्ही व तुमचे कुटुंब सुरक्षित राहण्यासाठीच्या खबरदारीच्या सगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे याची खातरजमा करा – आपल्या मुलांचे तसेच तुमचे स्वत:चे व तुमच्या घरात राहणा-या इतर प्रौढ व्यक्तींच्या लसीकरणाचे वेळापत्रक सांभाळा. फ्लूचे विषाणू सतत बदलत राहत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) शोधलेल्या या विषाणूच्या सर्वात नव्या प्रकारानुसार लसीमध्येही दरवर्षी सुधारणा केली जाते. म्हणूनच दरवर्षी लस घेणे इतके महत्त्वाचे आहे.
अबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स विभागाचे डायरेक्टर डॉ. जेजो करणकुमार म्हणाले, “लस ही काही फक्त मुलांसाठी नसते. प्रौढांनाही विशेषत: फ्लूसारख्या संसर्गांपासून संरक्षणाची गरज असते. दरवर्षी फ्लू इंजेक्शन घेतल्याने आजारी पडण्याची शक्यता कमी होते व तुम्हाला तो झालाच तर लक्षणांची तीव्रता कमी होण्यासही या लसीची मदत होते. प्रतिबंधात्मक देखभालीतील ही एक साधी उपाययोजना आहे, ज्यामुळे विशेषत: वयोवृद्ध किंवा सहआजार असलेल्या लोकांच्या बाबतीत मोठा फरक पडू शकतो.”
मुंबईमध्ये वाढतोय मेंदूच्या संसर्गजन्य आजाराचा धोका, पावसाळ्यात ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी
तुम्ही निरोगी असलात, तरीही फ्लूमुळे तुमच्या जीवनाची गती मंदावू शकते – कामावर गैरहजरी लागते, डॉक्टरांकडे जावे लागते आणि अचानक आजारपणावरचा खर्च अंगावर पडतो. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी फ्लूचे इंजेक्शन घेण्याची शिफारस करते. ही लस गर्भवती स्त्रिया आणि तब्येतीच्या इतर तक्रारी असलेल्या लोकांसह सर्व वयोगटांना लागू पडते – व ती गंभीर आजारापासून तुमचे संरक्षण होण्यास मदत करते.6 आपण हवामानावर तर नियंत्रण आणू शकत नाही, पण आपण आपल्या आरोग्याची सूत्रे आपल्या हातात घेऊ शकतो. वार्षिक फ्लूचे इंजेक्शन ही एक साधीसोपी, विज्ञानाचे पाठबळ लाभलेली उपाययोजना आहे, जी केवळ तुमचेच नव्हे, तर तुमच्या भोवतालच्या लोकांचेही – विशेषत: वयोवृद्ध, लहान मुले आणि जुने आजार असलेल्या व्यक्तींचेही संरक्षण करते. तेव्हा यावर्षीच्या पावसाळ्यात, लक्षणे दिसेपर्यंत थांबू नका. आपल्या डॉक्टरांशी फ्लूची लस घेण्याविषयी चर्चा करा. कारण निरोगी राहणे म्हणजे केवळ आजारांना प्रतिसाद देणे नव्हे – तर त्याचा संबंध आजाराचा प्रतिबंध करण्याशीही आहे.