Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

शरीरात पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. यामुळे डोकेदुखी आणि उलट्या होतात. पित्त कमी करण्यासाठी जीवनशैलीतील या सवयींमध्ये बदल करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 13, 2026 | 08:11 AM
पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या 'या' पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या 'या' पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

Follow Us
Follow Us:

पित्ताची पातळी वाढवणाऱ्या सवयी?
पित्त वाढवणारे पदार्थ?
पित्त कमी करण्यासाठी काय करावे?

दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. तिखट, तेलकट किंवा अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात पित्त वाढल्यानंतर छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, घशात आंबटपणा जाणवणे, पोटात जळजळ होणे किंवा जेवल्यानंतर अस्वस्थ वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. पण हा त्रास वारंवार होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. पित्त झाल्यानंतर अनेक लोक घरगुती उपाय करतात. घरगुती उपाय केल्यामुळे काही वेळापुरता आराम मिळतो आणि पुन्हा एकदा अपचनाचा त्रास वाढून आरोग्य बिघडते. अनेकांच्या शरीराची पित्त प्रकृती असते.(फोटो सौजन्य – istock)

Home Medicare service: ज्येष्ठ आणि घराबाहेर पडण्यास असमर्थ रुग्णांसाठी ‘होम मेडिकेअर’; डॉक्टर, नर्सिंग, फिजिओथेरपीची सुविधा

पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये पित्ताची झपाट्याने वाढून आरोग्य बिघडते. पित्ताची पातळी वाढल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. पण वारंवार पित्ताची गोळी खाणे शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे दैनंदिन आहारात बदल करून शरीराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरात पित्त वाढल्यानंतर डोकेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे पित्त वाढवणाऱ्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. चला तर जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमुळे आणि कोणत्या सवयींमुळे शरीरात पित्ताची पातळी झपाट्याने वाढते.

पित्ताची पातळी वाढवणाऱ्या सवयी:

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी दिवसभर उपाशी राहतात आणि संध्याकाळच्या वेळी भरपूर जेवण करतात. पण ही सवय शरीरासाठी अतिशय चुकीची आहे. त्यामुळे दिवसभरात योग्य अंतराने आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. रात्रीच्या जेवणात अतिप्रमाणात अन्नपदार्थ खाऊ नये. यामुळे पचनक्रिया बिघडते. जेवणाच्या योग्य वेळा शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तींना भूक सहन होत नाही. त्यामुळे भूक लागल्यानंतर शरीरास आवश्यक असलेले पदार्थ खावेत.

अतितिखट, जास्त तेलकट, फार आंबट पदार्थांचा रात्रीच्या आहारात समावेश करू नये. पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तींनी शरीरास सहज पचन होणारे पदार्थ खावेत. कारण अतितिखट पदार्थ खाल्ल्यामुळे छातीत जळजळ वाढते. जेवणानंतर लगेच झोपणे अतिशय चुकीचे आहे. जेवण आणि झोप यामध्ये ३ तासांचे अंतर असणे फार आवश्यक आहे. रात्री उशिरा आणि भरपेट जेवण्याची सवय असल्यास ती योग्य वेळी बदलणे फार गरजेचे आहे. जास्त चहा, कॉफी, शीतपेय किंवा मद्यपानामुळे काहींना पित्ताचा त्रास खूप जास्त वाढतो.

स्मार्टवॉच घातल्याने खरंच होतो कॅन्सर? जाणून घ्या सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांमधील खरे सत्य

शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी सगळ्यात आधी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यावे. तुपामुळे शरीरातील विषारी मल बाहेर पडून जाण्यास मदत होते. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी पुदिना, ताक, जिरं इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेले पित्त कमी होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पित्ताचा त्रास वाढवणारे पदार्थ कोणते?

    Ans: अतितिखट, तेलकट, आंबट आणि जास्त मसालेदार पदार्थ पित्ताचा त्रास वाढवू शकतात. मिरची, लोणचे, तळलेले पदार्थ, जंक फूड आणि अतिआंबट पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवावे.

  • Que: पित्त वाढल्यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात?

    Ans: पित्ताचा त्रास वाढल्यास छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोटदुखी, अपचन, मळमळ आणि अॅसिड रिफ्लक्ससारख्या समस्या जाणवू शकतात.

  • Que: पित्ताचा त्रास असताना तिखट पदार्थ खावे का?

    Ans: पित्ताचा त्रास वारंवार होत असल्यास अतितिखट पदार्थ टाळणे किंवा त्यांचे सेवन कमी करणे फायदेशीर ठरू शकते.

Web Title: Do not consume these foods that aggravate acidity issues otherwise you may face serious digestive problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • acidity
  • Digestion Problem
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर
1

आरोग्यासाठी नारळाचे तेल की Avocado ऑईल? रोजच्या आहारासाठी कोणते तेल ठरेल आरोग्यदायी, जाणून घ्या सविस्तर

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या
2

सकाळच्या नाश्त्यात चुकीचे पदार्थ खात असाल तर थांबा! सकाळी चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, उद्भवतील गंभीर समस्या

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? उपाशी पोटी ‘या’ पद्धतीने करा आल्याचे सेवन
3

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? उपाशी पोटी ‘या’ पद्धतीने करा आल्याचे सेवन

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
4

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.