
पोटाच्या उजव्या कोपऱ्यात वाढलेल्या वेदनांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, उद्भवू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका
कोणत्या कारणांमुळे पोटात वेदना होतात?
पोटात उजव्या बाजूला वेदना होण्याची कारणे?
पोटाच्या डाव्या बाजूला वेदना होण्याची कारणे?
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पोटात दुखते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारा बदल, पोषक घटकांचा अभाव, दूषित पाण्याचे सेवन, अपचन इत्यादी समस्या उद्भवल्यास पोटात वेदना वाढतात. या वेदना काहीवेळा अतिशय तीव्र होतात, ज्या सहन होत नाही. मासिक पाळीच्या चक्रात होणाऱ्या बदलांमुळे किंवा पाळीच्या दिवसांमध्ये अतिरक्तस्त्राव झाल्यानंतर पोटात क्रॅम्प येतात. पण काहीवेळा पोटाच्या ठराविक एका कोपऱ्यात वेदना होत असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. कारण अतिशय सामान्य वाटणाऱ्या समस्या कालांतराने वाढू लागतात आणि संपूर्ण शरीराला हानी पोहचवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटाच्या डाव्या आणि उजव्या कोपऱ्यात कोणत्या कारणांमुळे वेदना होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
पोटात वेदना होणे किंवा शरीरात दिसून येणारी लहान मोठी लक्षणे गंभीर आजारांचे कारण ठरू शकतात. अपेंडिक्सचा त्रास वाढल्यानंतर पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतात. चालताना, खोकताना किंवा उठबस करताना वारंवार पोटात वेदना होत असतील तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शारीरिक स्थिती आणखीनच बिघडण्याची शक्यता असते. केवळ गॅस, बद्धकोष्ठतेमुळे नाहीतर आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांमुळे पोटात वेदना होतात.
पोटाच्या डाव्या बाजूला बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस इत्यादी अनेक कारणामुळे वेदना होतात. मोठ्या आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण, बद्धकोष्ठता, गॅस, आतड्याला आलेली सूज इत्यादी अनेक कारणांमुळे खूप जास्त वेदना होतात. याशिवाय महिलांमध्ये अंडाशयाशी संबंधित समस्या, पाळीच्या वेदना किंवा सिस्ट झाल्यामुळे पोटात खूप जास्त वेदना होतात.
यकृत आणि लिव्हरच्या समस्या वाढू लागल्यानंतर पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतात. यकृत आणि पित्ताशय एकमेकांशी जोडलेले असते. पित्ताशयात खडे, फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सोरायसिस सारख्या गंभीर समस्या उद्भवू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. उलटी, मळमळ किंवा ताप इत्यादी समस्या लिव्हर खराब झाल्यानंतर वाढतात.
Constipation Test: 2 दिवसातून एकदा पोट साफ होणे योग्य? बद्धकोष्ठता आहे की नाही कसे समजून घ्याल
किडनी स्टोन झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. किडनी स्टोनमुळे कंबर दुखणे, लघवी करताना जळजळ किंवा लघवीचा रंग बदलणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. महिलांमध्ये प्रामुख्याने गर्भाशयसंबंधित समस्या प्रामुख्याने उद्भवतात. पुरुषांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना सूज आल्यानंतर पोटाच्या एका बाजूला सूज येते.
Ans: अयोग्य आहार किंवा जास्त खाल्ल्याने पोट फुगते आणि दुखते.
Ans: आल्याचा चहा प्या किंवा आल्याचे छोटे तुकडे खा.
Ans: उलट्या, ताप किंवा जुलाब (डायरिया) होत असल्यास.