शरीरातील ऊर्जा जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी नियमित करा 'या' हाय प्रोटीन बियांचे सेवन
सध्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एक्स्ट्रा एनर्जीची गरज पडते. स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी जेवणाव्यतिरिक्त अधून मधून खाण्याचीही गरज पडते. या वेळेत सहज उपलब्ध होणाऱ्या बटाटा वडा, भजी, वेफर्स, बेकरी उत्पादने अशा तळकट अरबट चरबट खाण्याने पोट भरल्याचा फिल येत असला, तरी आरोग्य मात्र बिघडते. विविध प्रकारच्या धान्यांच्या, भाज्यांच्या क्यिा पोषणमूल्यांनी समृद्ध असतात. यामध्ये आरोग्यदायी जीवनसत्त्वे, क्षार, अँटीऑक्सिडेंट्स असतात. कामाच्या धावपळीमध्ये सकाळचा नाश्ता किंवा इतर कोणत्याही गोष्टी खाण्यास वेळ मिळत नाही. वारंवार उपाशी राहिल्यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे दैनंदिन आहारात छोट्या मोठ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात पालेभाज्यांसोबतच पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते आणि तुम्ही कायमच हेल्दी राहाल.(फोटो सौजन्य – istock)
Constipation Test: 2 दिवसातून एकदा पोट साफ होणे योग्य? बद्धकोष्ठता आहे की नाही कसे समजून घ्याल
भोपळ्याच्या बियांमध्ये ई जीवनसत्त्व, झिंक, मॅगेनीज, फॉस्फरस, मोनोसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा ६ फॅटी ऍसि असतात, हृदयविकार, मधुमेहींसाठीही भोपळ्याच्या बिया उपयुक्त आहेत. सर्व प्रकारचे कॅन्सर्स, विशेषतः प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. यासाठी रोज दोन ते चार चमचे भोपळ्याच्या भाजलेल्या बिया खाल्ल्याच पाहिजेत.
जवस बियांमध्ये प्रथिने व १ जीवनसत्त्व, ओमेगा ३ फॅटी ऍसिड्, झिंक, मॅग्नेशियम, कॉपर हे क्षार असतात. दोन टेबलस्पून जवसाच्या बियांमध्ये ६ ग्रॅम फायबर आणि ४ ग्रॅम प्रथिने असतात.
शेंगदाण्यांमध्ये प्रथिने आणि शरीराला आवश्यक असणारी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. कच्चे, भाजलेले खारे शेंगदाणे किंवा गूळ-शेंगदाण्याचा लाडू, शेंगदाण्याचा कूट, चिक्की अशा कोणत्याही प्रकारात शेंगदाणे खाता येतात.
तीळ बुद्धी वाढवितात, दातांसाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात व कफ वाढवितात. तसेच, मूळव्याधीवर गुणकारी, हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहेत. वजन वाढविणाऱ्या आणि कमी करू इच्छिणाऱ्या अशा दोघांनीही तीळ खाणे हितकारक आहे. काळ्या तिळांत औषधी गुणधर्म असतात.
शरीरात ही ७ लक्षणे दिसली तर सावध व्हा! डायबिटीज होण्याची अफाट शक्यता
सूर्यफुलात ई जीवनसत्त्व,कॅल्शियम, अँटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. या बिया पोषणमूल्यांनी अत्यंत समृद्ध आहेत. या बियांमधील फायटोसस्टेरॉल घटकामुळे कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.






