Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटात साचून राहिलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? आरशासारख्या नितळ त्वचेसाठी करून पहा ‘हे’ प्रभावी उपाय

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स गट हेल्थ खराब झाल्यामुळे येतात. त्यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी ठेवणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 07, 2026 | 10:05 AM
पोटात साचून राहिलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? आरशासारख्या नितळ त्वचेसाठी करून पहा 'हे' प्रभावी उपाय

पोटात साचून राहिलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? आरशासारख्या नितळ त्वचेसाठी करून पहा 'हे' प्रभावी उपाय

Follow Us
Follow Us:

चेहऱ्यावरील ग्लो पोटाच्या आरोग्यावर अवलंबून असतो. पोट स्वच्छ आणि साफ असेल तर चेहऱ्यावर सुद्धा चमकदार ग्लो येतो. पण पोटाचे आरोग्य बिघडल्यानंतर गाल, हनुवटी आणि चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स ग्लो नष्ट करून टाकतात. आतड्यांमध्ये किंवा रक्तात जमा झालेल्या विषारी घाणीचा परिणाम संपूर्ण चेहऱ्यासोबतच आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चेहऱ्यावर येणारे मोठे आणि लालसर फोड शरीराच्या अंतर्गत अस्वच्छतेचे, पोटातील जंतांचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होणे फार आवश्यक आहे. पिंपल्स घालवण्यासाठी केमिकल युक्त क्रीम किंवा सीरमचा वापर करण्याऐवजी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करणे फार आवश्यक आहे. आतड्यांमध्ये घाण बाहेर पडून गेल्यास चेहऱ्यावर किंवा इतर कुठेही पिंपल्स येत नाहीत आणि त्वचा कायमच उजळदार राहते. चला तर जाणून घेऊया गट हेल्थ सुधारण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)

Skin Pigmentation: चेहऱ्यावरील पिग्मेंटेशनमुळे त्रस्त आहात? ‘हे’ घरगुती उपाय करा ट्राय, त्वचा उजळेल

कडुलिंब आणि तुळशीच्या पानांचे ड्रिंक:

कडुलिंब संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे. सकाळी उठल्यानंतर टोपात पाणी घेऊन त्यात कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने आणि काळीमिरी टाकून उकळवून घ्या. त्यानंतर पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यावर पाणी गाळून घ्या. उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यास शरीर स्वच्छ होण्यास मदत होतील. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात तर काळीमिरीच्या सेवनामुळे शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. तसेच पोटात जंत झाले असल्यास कडुलिंबाची पाने चावून त्यावर गरम पाणी प्यावे. यामुळे त्वचा स्वच्छ होण्यासोबतच शरीर सुद्धा स्वच्छ होईल.

ओवा आणि बडीशेपचे पाणी:

संध्याकाळच्या वेळी चहा पिण्याऐवजी ओवा आणि बडीशेपचे पाणी प्यावे. हे पाणी पचनसंस्था चांगली ठेवण्यासाठी मदत करते. एक ग्लासभर पाण्याला उकळी काढून त्यात ओवा आणि बडीशेप घालून मिक्स करा. टोपातील पाणी अर्धा झाल्यानंतर गाळून घ्या आणि सेवन करा. यामुळे पोटातील खराब बॅक्टेरिया नष्ट होतील आणि पोटाला आलेली सूज कमी होईल. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुणकारी घटक शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात.

चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास ग्लो येतो का? जाणून घ्या चेहऱ्यावर बर्फ लावण्याची योग्य पद्धत आणि त्वचेला होणारे फायदे

एरंडेल तेलाचा वापर:

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसेल किंवा बद्धकोष्ठता वाढत असल्यास एरंडेल तेल घेतल्यास फरक दिसून येईल. एरंडेल तेल कायमच गरम पाण्यात किंवा नारळाच्या दुधात मिक्स करून प्यावे. बिघडलेली पचनसंस्था सुधारण्यासाठी एरंडेल तेल खूप प्रभावी ठरते. हे तेल आतड्यांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासोबतच पोटात वाढलेले जंत नष्ट करण्यास मदत करतात. चेहरा नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do pimples appear on the face due to the dirt accumulated in the stomach try these effective remedies for mirror smooth skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

ओठांवर येईल नॅचरल गुलाबी रंग! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच तयार करा लिपबाम, विकतचे प्रॉडक्ट वापरणे कायमचे जा विसरून
1

ओठांवर येईल नॅचरल गुलाबी रंग! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच तयार करा लिपबाम, विकतचे प्रॉडक्ट वापरणे कायमचे जा विसरून

Hair Care Tips: झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान
2

Hair Care Tips: झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण
3

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी
4

वाढत्या लठ्ठपणामुळे हैराण झाला आहात? मग नियमित करा ‘या’ पद्धतीने दालचिनीच्या पाण्याने सेवन, पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.