चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास ग्लो येतो का? जाणून घ्या चेहऱ्यावर बर्फ लावण्याची योग्य पद्धत आणि त्वचेला होणारे फायदे
हल्ली महिलांसह पुरुषांना सुद्धा त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. चेहऱ्यावर टॅन वाढणे, त्वचा निस्तेज होणे, त्वचा कोरडी पडणे तर काहीवेळा चेहऱ्यावर इन्फेक्शन होऊन रॅश किंवा लालसर पिंपल्स येणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने त्वचा खूप जास्त खराब झाल्यानंतर वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्ट वापरून त्वचेची काळजी घेतली जाते. फेस मास्क, फेसपॅक तर काहीवेळा फेशिअल, क्लीनअप सुद्धा केले जाते. मात्र त्वचेवर वाढलेला टॅन किंवा पिंपल्स घालवण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटचा त्वचेवर फारसा परिणाम दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)
Skin Care Tips: चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? फक्त तेलकट त्वचा नव्हे, ‘या’ सवयीही ठरू शकतात कारणीभूत
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. उन्हाळ्यात त्वचा खूप जास्त चिकट आणि तेलकट होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होऊन राहते. याच घाणीमुळे त्वचेवर पिंपल्स येणे किंवा मोठे मोठे फोड येऊन त्वचा खराब होऊन जाते. बऱ्याचदा त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. बर्फाच्या वापरामुळे त्वचेला भरमसाट फायदे होतात आणि त्वचा उजळदार दिसते. प्रत्येकाच्या फ्रिजमध्ये कायमच बर्फ उपलब्ध असतो. आज आम्ही तुम्हाला बर्फाचा कशा पद्धतीने वापर करावा? चेहऱ्यावर नियमित बर्फ लावल्यास त्वचेला नेमके काय फायदे होतात? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये चेहऱ्यावर नियमित बर्फ लावावा. वाटीमध्ये किंवा बर्फाच्या ट्रेमध्ये पाणी ठेवून फ्रिजमध्ये बर्फ तयार होण्यासाठी ठेवा. त्यानंतर ५ ते ६ तासानंतर तयार केलेला बर्फ काढून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. चेहऱ्यावर बर्फ लावल्यामुळे त्वचेखालील रक्तवाहिन्या काही काळासाठी आकुंचन पावतात आणि रक्तभिसरण होण्यास मदत होते. रक्तप्रवाह सुधारल्यामुळे त्वचेच्या पेशींना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळतात. यामुळे त्वचा अतिशय उजळदार आणि चमकदार दिसते. चेहऱ्यावरील थकवा घालवण्यासाठी बर्फाचा वापर करावा. वारंवार वापरलेले केमिकल युक्त स्किन केअर त्वचेची गुणवत्ता खराब करून टाकतात. ज्याच्या परिणामामुळे चेहऱ्यावरील ग्लो नाहीसा होतो.
बर्फ त्वचेवर थेट लावू नये. बर्फ कायमच कॉटनच्या रुमालात किंवा कपड्यात गुंडाळून नंतरच चेहऱ्यावर लावावा. कारण बर्फ थेट चेहऱ्यावर लावल्यास आइस बर्न होऊन त्वचा पूर्णपणे लाल पडू शकते. संपूर्ण चेहऱ्यावर ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ बर्फ फिरवू नये. त्वचेसाठी साध्या पाण्याचा वापर करण्याऐवजी गुलाबपाणी किंवा काकडीचा रस, ग्रीन टी इत्यादी पदार्थांचा वापर करावा. तयार केलेला रस बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवून बर्फ तयार झाल्यानंतर त्वचेवर लावावा. चेहऱ्यावरील मोठे झालेले उघडे छिद्र कमी करण्यासाठी बर्फ अतिशय प्रभावी ठरते. बर्फाच्या वापरामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते.






