Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमध्ये सडलेल्या घाणीमुळे त्वचेवर पिंपल्स येतात? पोटाच्या तक्रारी कमी करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल नितळदार

गट हेअल्थ खराब झाल्यामुळे त्वचेवर पिंपल्स, मुरूम किंवा सुरकुत्या येतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केल्यास त्वचेवरील ग्लो कायम टिकून राहतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2026 | 07:58 AM
आतड्यांमध्ये सडलेल्या घाणीमुळे त्वचेवर पिंपल्स येतात? पोटाच्या तक्रारी कमी करण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ

आतड्यांमध्ये सडलेल्या घाणीमुळे त्वचेवर पिंपल्स येतात? पोटाच्या तक्रारी कमी करण्यासाठी नियमित खा 'हे' पदार्थ

Follow Us
Follow Us:

आतड्यांमध्ये विषारी घटक कशामुळे साचून राहतात?
आतडे स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय?
त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी काय खावे?

चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी महिला कायमच महागड्या स्किन केअरचा किंवा स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतात. कधी फेसपॅक लावला जातो तर कधी पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप, फेशिअल करून घेतले जाते. स्किनकेअर प्रोडक्ट्स, फेशियल्स, सिरम्स आणि वेगवेगळ्या कॉस्मेटिक उपचार केल्यानंतर सुद्धा त्वचा चमकदार आणि ग्लोइंग दिसत नाही. त्वचेची कायमच वरून काळजी घेतली जाते. पण अंतर्गत शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. सुंदर त्वचेसाठी गट हेल्थ चांगले असणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

पावसात भिजल्याने वाढू शकतो त्वचेच्या संसर्गाचा धोका; स्किन इन्फेक्शन, रॅशेस अन् खाज टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आतड्यांचे आरोग्य चांगले राहिल्यास त्वचेवर सुद्धा चमकदार ग्लो टिकून राहील आणि चेहरा अतिशय सुंदर दिसेल. आतडे आणि त्वचा हे मानवी शरीरातील मोठे पृष्ठभाग आहेत, ज्यामध्ये अब्जावधी सूक्ष्मजीव राहतात. याला मायक्रोबायोम असे सुद्धा म्हंटले जाते. पोटातील आणि त्वचेवरील मायक्रोबायोमची कार्यपद्धती एकमेकांशी थेट जोडलेली असल्यामुळे आतडे स्वच्छ न झाल्यास त्वचेच्या समस्या वाढण्याची जास्त शक्यता असते. आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीचा परिणाम थेट त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे कायमच गट हेल्थ चांगले असणे फार आवश्यक आहे. चुकीचा आहार, मानसिक ताण, अपुरी झोप किंवा अँटीबायोटिक्सचा अतिवापर केल्यामुळे पोटातील चांगल्या विषाणूचा समतोल बिघडून जातो.

निरोगी आतड्याचे अस्तर शरीरातील हानिकारक घटक रक्तामध्ये जाण्यापासून रोखते. त्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडल्यानंतर आतड्यांना सुद्धा हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला गट हेल्थ चांगले ठेवण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून जाईल आणि पोट स्वच्छ होईल.

प्रोबायोटिक्सचे आहारातील महत्त्व:

आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात प्रोबायोटिक्स असलेल्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. जेवणानंतर नियमित एक ग्लास ताक किंवा वाटीभर दही खाल्ल्यास आतड्यांची हालचाल निरोगी राहते आणि आतड्यांमध्ये चांगल्या विषाणूची वाढ होते. पोटात चांगले विषाणू टिकून राहावेत यासाठी प्रोबायोटिक्स’ आणि ‘प्रीबायोटिक्स’ अतिशय महत्वाचे असतात. ताजे दही, ताक आणि इतर आंबवलेले पदार्थ इत्यादींमध्ये प्रोबायोटिक्सचे उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आहारात प्रोबायोटिक्स असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

झोप न येणे, चिडचिड आणि सतत थकवा? हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय ठरतील फायदेशीर

लसूण, कांदा, केळी, ओट्स आणि विविध फळे-भाज्यांमध्ये प्रीबायोटिक्स मोठ्या प्रमाणावर आढळून येते. आहारात केलेल्या बदलांसोबतच मानसिक तणाव नियंत्रणात ठेवणे सुद्धा आवश्यक आहे. हार्मोन्सचे असंतुलन, अनुवंशिकता, प्रदूषण, उन्हाचा प्रभाव आणि स्किन केअर रुटीनमध्ये होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. पोटाचे आरोग्य सुधारल्याने पिंपल्स, पिगमेंटेशन किंवा केस गळण्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आतड्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे खरोखरच पिंपल्स येतात का?

    Ans: आतड्यांचे आरोग्य, आहार आणि त्वचेचे आरोग्य यांचा संबंध असू शकतो. असंतुलित आहार, बद्धकोष्ठता किंवा आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे असंतुलन काही लोकांमध्ये त्वचेच्या समस्यांशी संबंधित असू शकते.

  • Que: आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणते पदार्थ नियमित खावेत?

    Ans: दही, ताक, ओट्स, संपूर्ण धान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, जवस, चिया बिया आणि भरपूर पाणी यांचा आहारात समावेश करावा.

  • Que: प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स त्वचेसाठी फायदेशीर आहेत का?

    Ans: होय. दही, ताक यांसारखे प्रोबायोटिक पदार्थ आणि केळी, कांदा, लसूण, ओट्स यांसारखे प्रीबायोटिक पदार्थ आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा त्वचेलाही होऊ शकतो.

Web Title: Do pimples appear on the skin due to accumulated waste in the intestines eat these foods regularly to alleviate stomach issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 07:58 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • gut health
  • skin care tips

संबंधित बातम्या

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश
1

Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा ‘या’ सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर
2

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर
3

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
4

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.