चेहऱ्यावरील चमक पुन्हा मिळवण्यासाठी नियमित करा 'ही' योगासने
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी नियमित व्यायाम करणे फार आवश्यक आहे. नियमित व्यायाम आणि योगासने केल्याने आरोग्य सुधारते. अनेकदा शरीराचे रक्तभिसरण होत नाही. रक्तभिसरण न झाल्याने आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. रक्तभिसरण बिघडल्यामुळे पचनसंस्था खराब होऊन जाते, चेहऱ्यावरील चमक नाहीशी होते, आरोग्यसंबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. सर्वच ऋतूंमध्ये केस आणि त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर चेहऱ्यावरील चमक पूर्णपणे नाहीशी होऊन जाते.
चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी परत मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. पण हे उपाय केल्याने फारकाळ चेहऱ्यावर चमक राहत नाही. त्यामुळे चेहऱ्यावरील चमक पुन्हा वाढवण्यासाठी तुम्ही नियमित योगासने करू शकता. योगासने केल्याने शरीराचे रक्तभिसरण व्यवस्थित होते. योगासने केल्याने चेहऱ्यावर हरवलेली चमक पुन्हा एकदा परत येईल.(फोटो सौजन्य-istock)
चेहऱ्यावरील चमक पुन्हा मिळवण्यासाठी नियमित करा ‘ही’ योगासने
सर्वांगासन केल्याने रक्तभिसरण व्यवस्थित होते. चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा एकदा परत मिळवण्यासाठी सर्वांगासन करा. हे आसन नियमित केल्याने संपूर्ण शरीरातील रक्तभिसरण व्यवस्थित होईल. सर्वांगासन केल्याने दीर्घकाळ तरुण दिसता येईल.
चेहऱ्यावरील चमक पुन्हा मिळवण्यासाठी नियमित करा ‘ही’ योगासने
चेहरा आणि पाचक अवयवांमध्ये रक्ताभिसरण वाढवण्यासाठी हलासना केले जाते.आसनं हे आसन केल्याने रक्तभिसरण व्यवस्थित होते. चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित योगासने करावी.या आसनामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. गॅस, अपचन, फुगवणे इत्यादी अनेक समस्या दूर होतात. पण पाठ किंवा मानेसबंधित समस्या जाणवत असतील अशांनी हे आसन करू नये.
चेहऱ्यावरील चमक पुन्हा मिळवण्यासाठी नियमित करा ‘ही’ योगासने
केस आणि त्वचेवरील चमक पुन्हा मिळवण्यासाठी तुम्ही शिरशासन करू शकता. हे आसन नियमित केल्याने त्वचेवर ग्लो येऊन चेहरा चमकदार होतो. या आसनामुळे मेंदूला आवश्यक प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया निरोगी राहते. भिंतीचा आधार घेऊन नियमित हे आसन केल्याने त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसून येतील.