Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटात सतत गुडगुड होते? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा उद्भवतील आतड्यांसंबंधित आजार

आहारात होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे पचनक्रिया बिघडून जाते. वारंवार अपचन आणि पोटात गुडगुड, गॅस झाल्यास आतड्यांचे आरोग्य बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया सतत पोटातून आवाज येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 25, 2026 | 07:57 AM
पोटात सतत गुडगुड होते? शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा उद्भवतील आतड्यांसंबंधित आजार

पोटात सतत गुडगुड होते? शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा उद्भवतील आतड्यांसंबंधित आजार

Follow Us
Follow Us:

पचनक्रिया बिघडण्याची कारणे?
पोटातून गुडगुड आवाज कशामुळे येतो?
पचनक्रिया सुधारण्यासाठी उपाय?

जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जंक फूडचे अतिसेवन, सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. बिघडलेल्या पचनक्रियेमुळे आतडे आणि पोटासंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. ॲसिडिटी, आंबट ढेकर येणे, पोटात सतत गुडगुड होणे, उलट्या, मळमळ आणि डोकेदुखीची समस्या उद्भवून आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. बऱ्याचदा पोटातून गुडगुड आवाज येतो. पोटातून येणारा गुडगुड आवाज सगळ्यांचं अतिशय सामान्य वाटतो. पण हा आवाज पचनक्रिया सुरू असल्यामुळे किंवा आतड्यांमधून अन्न, द्रव आणि वायू पुढे सरकत असल्यामुळे येतो. प्रत्येक वेळी येणारा आवाज हा कोणत्याही आजाराचे लक्षण असू शकत नाही. मात्र वारंवार पोटातून आवाज, पोटदुखी, जुलाब, उलटी यांसारखी लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील ही ५ फळे, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश

पोटातून गुडगुड आवाज सामान्यपणे भूक लागल्यानंतर येतो. बराच वेळ कोणत्याही पदार्थांचे सेवन न केल्यास पोट आणि आतड्यांमधील स्नायू सक्रिय होतात. शरीर अन्नासाठी तयार होत असल्यामुळे आतड्यांची हालचाल वाढते आणि पोटातून सतत गुडगुड आवाज येऊ लागतो. त्यामुळे भूक लागल्यास पचनास हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा. याशिवाय पोटात गॅस तयार करणे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे सुद्धा पोटातून गुडगुड आवाज येऊ लागतो. हरभरा, राजमा, वाटाणा, कोबी, फ्लॉवर, शीतपेये किंवा जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर आतड्यांमध्ये वायू तयार होतो. हा वायू पुढे पुढे सरकत राहिल्यामुळे पोटातून गुडगुड आवाज याशिवाय पचनक्रिया बिघडून जाते आणि पोटात जडपणा वाढू लागतो.

पोटात जमा झालेल्या वायूमुळे पोट जड झाल्यासारखे वाटते. घाई करत जेवणे, अन्नपदार्थ व्यवस्थित नीट चावणे किंवा चुकीच्या पदार्थांचे आहारात सेवन केल्यामुळे आतड्यांची हालचाल बिघडते आणि आरोग्याला हानी पोहचते. पोटामध्ये वायूचे प्रमाण वाढल्यास पोटातून वारंवार आवाज येऊ येऊ लागतो. दैनंदिन आहारात पचनास अतिशय जड असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास पोटात जडपणा, आंबट ढेकर, ॲसिडिटी इत्यादी समस्या वाढू लागतात. पोटात साचून राहिलेल्या वायूमुळे आतड्यांची हालचाल बिघडते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

Stomach Infection: पोटाचा संसर्ग की फूड पॉइझनिंग? स्टूल टेस्ट सांगते आजाराचं खरं कारण

आतड्यांमध्ये जास्त वेळ मल साचून राहिल्यास आंबट ढेकर, पोटात जडपणा, गुडगुड, गॅस, जुलाब होऊन आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. याशिवाय काहींना दुधाचे पदार्थ खाल्ल्यानंतर खूप जास्त त्रास होतो. आतड्यांचा संसर्ग झाल्यानंतर गुडगुड होण्यासोबत पोटदुखी, जुलाब, मळमळ किंवा ताप येण्याची जास्त शक्यता असते. मेंदू आणि पचनसंस्था यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे शरीरात वाढलेला मानसिक तणाव पचनक्रियेवर थेट परिणाम करतो. हा त्रास कमी करण्यासाठी नियमित भरपूर पाणी, अन्न नीट चावून खाणे, गॅस वाढवणाऱ्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते आणि शरीराला कोणताही त्रास होत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोटात सतत गुडगुड होणे म्हणजे काय?

    Ans: पचनक्रियेदरम्यान आतड्यांमध्ये अन्न, द्रव आणि वायू हालचाल करताना आवाज होणे सामान्य आहे. मात्र हा त्रास वारंवार होत असल्यास किंवा इतर लक्षणांसह दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • Que: पोटात गुडगुड होण्यामागील प्रमुख कारणे कोणती असू शकतात?

    Ans: भूक लागणे, अपचन, गॅस, अन्नाची असहिष्णुता (Food Intolerance), आतड्यांतील संसर्ग, इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) किंवा इतर पचनसंस्थेच्या समस्या यामुळे हा त्रास होऊ शकतो.

  • Que: पोटातील गुडगुड कमी करण्यासाठी काय करावे?

    Ans: संतुलित आहार घ्या, पुरेसे पाणी प्या, अति तेलकट व मसालेदार पदार्थ टाळा, हळूहळू जेवा, नियमित व्यायाम करा आणि ताणतणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Do you experience constant rumbling in your stomach do not ignore these symptoms or you could develop intestinal disorders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 07:57 AM

Topics:  

  • acidity
  • Digestion Problem
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care: पातळ झालेले केस महिनाभरात होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ स्वयंपाक घरातील पदार्थ
1

Hair Care: पातळ झालेले केस महिनाभरात होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ स्वयंपाक घरातील पदार्थ

मेकअप रिमूव्हर संपले आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून काही मिनिटांमध्ये काढा वॉटरप्रूफ मेकअप
2

मेकअप रिमूव्हर संपले आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून काही मिनिटांमध्ये काढा वॉटरप्रूफ मेकअप

केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर
3

केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब
4

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.