(फोटो सौजन्य: Pinterest)
Pune Coffee Culture: कटिंग चहा ते कोल्ड ब्रू… पुण्यात रंगतंय ‘कॉफी कल्चर’!
वजन कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी बोरि्ंग जेवण आणि किटो डाएट करण्याची गरज नाही. काही पदार्थांचे सेवन करुन वजन झपाट्याने कमी केले जाऊ शकते. अनेकजन आपल्या वेट लाॅस जर्नीत फळांचा समावेश करत असतात. वजन कमी करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असतोच पण यासोबतच आहारात काही हेल्दी पदार्थांचाही समावेश करायला हवा. फळ अनेकांना खायला आवडतात पण वेट लाॅस जर्नीत या फळांची योग्य प्रकारे निवड करावी. आज या लेखात आपण काही फळांची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांना आपल्या आहारात समावेश करुन तुम्ही तुमचे वजन झपाट्याने कमी करु शकता.
सफरचंद
सफरचंद आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरणार फळ आहे हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. याचे सेवन बऱ्याच काळापर्यंत पोटाला भरलेले ठेवते. जर तुम्हाला सतत भूक लागत असेल तर दिवसातून एकदा तुम्ही सफरचंदाचे सेवन करु शकता. याचे सेवन भूक कमी करते आणि शरीरातील कॅलरिज नियंत्रणात करण्यास मदत करते.
पपई
पपईचे सेवन पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी फायद्याचे मानले जाते. हे शरीरात जमलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते आणि फॅट मेटाबाॅलिजम वेगवान करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही फळांचे सेवन करु शकता.
कलिंगड
कलिंगडामध्ये पाण्याचा भरपूर साठा आढळतो. यात साधारण ९० टक्के पाण्याचे प्रमाण असते. अशात याचे सेवन शरीरात पाण्याची कमतरता भरुन काढते. यामुळे पोट भरलेले राहते आणि वजन वाढत नाही.
संत्री
व्हिटॅमिन सी आणि फायबरने भरलेले संत्री हे फळ इम्युनिटी वाढवत नाही परंतु शरीरातील चरबी वितळवण्यासाठी याची मोठी मदत होऊ शकते. याचे सेवन देखील दिर्घकाळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते.
झोपण्याचे ‘मिलिट्री स्लीप मेथड’ नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या
किवी
वजन कमी करण्यासाठी कीवीचे सेवन केले जाते. यात कमी कॅलरीज, भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी असते जे वजन कमी करण्यास मदत करते. याच्या सेवनाने पचनक्रिया देखील सुधारते ज्यामुळे शरीरातील टाॅक्सीन बाहेर काढण्यास मदत मिळते.






