जर तुम्हांला विविध प्रकारची नाणी (Coins) जमा करण्याचा छंद (Hobby) असेल किंवा विविध नाण्यांचे कलेक्शन करण्याची आवड असेल तर ही बातमी (News) तुमच्यासाठी नक्की महत्त्वाची आहे. कारण जी प्राचीन काळी नाणी व्यवहारात होती, ती आता मोठ्या प्रमाणात लुप्त झाली आहेत. मात्र त्यातील काही नाणी अस्तित्वात आहेत किंवा त्यानंतरच्या काळातील देखील नाणी अस्तित्वात आहेत. चला तर मग जाणून घेऊन 75, 150 किंवा 400च्या नाण्यांविषयी…
75, 150 किंवा 400ची नाणी अस्तित्वात आहेत का?
दरम्यान, मीडिया माहितीनुसार 75, 150 किंवा 400ची नाणी जरी सध्या अस्तित्वात असली तरी, ही नाणी दैनंदिन चलनात याचा वापर होत नाही. पण ही नाणी अतिशय दुर्मिळ असून, या नाण्यांना मोठी मागणी आहे, छंद म्हणून ही नाणी जवळ बाळगली जातात. त्यामुळं 75, 150 किंवा 400 या नाण्यांचे मोठे आकर्षण लोकांना आहे.
75, 150 व 400 नाणी कधी आली?
150 हे नाणे जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी यांची 150 वी जयंतीनिमित्त सरकारने हे नाणे आणले होते. त्यानंतर 75 हे नाणे राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचा हीरक महोत्सवानिमित्त 75 हे नाणे सरकारने आणले होते. तर 250चे नाणे राज्यसभेचे 250 वे अधिवेशन होते, याचे औचित्य साधत सरकारने 250 चे नाणे आणले होते.
कुठं मिळवता येतील ही नाणी?
जर तुम्हांला अशी नाणी हवी असल्यास किंवा या नाण्याविषयी माहिती हवी असल्यासा तुम्ही खालील लिंकवर जाऊन तुम्हाला ही नाणी मिळवता येतील.
Commemorative Coins






