Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हातापायांना वारंवार सूज येते? शरीरसंबंधित उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या यामागील कारणे आणि उपाय

शरीरात पाणी साचून राहिल्यामुळे हातापायांना सूज येण्यासोबतच थकवा आणि अशक्तपणा जाणवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2026 | 08:28 AM
हातापायांना वारंवार सूज येते? शरीरसंबंधित उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या, जाणून घ्या यामागील कारणे आणि उपाय

हातापायांना वारंवार सूज येते? शरीरसंबंधित उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या, जाणून घ्या यामागील कारणे आणि उपाय

Follow Us
Follow Us:

हातापायांना वारंवार सूज येते?
किडनीचे आरोग्य कशामुळे बिघडते?
हातापायांना सूज येऊ नये म्हणून काय करावे?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, आहारात सतत होणारे बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा हातापायांना सूज येते. तर काहीवेळा वारंवार शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. ही समस्या जास्त वेळ उभं राहिल्यामुळे किंवा मीठाचे जास्त सेवन, पावसाळ्यात कमी शारीरिक हालचाली इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीराला सूज येण्यामागे अनेक कारण आहेत. किडनी, हृदय, यकृत किंवा थायरॉईडसारख्या गंभीर आजारांमुळे हातापायांना सूज येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला वारंवार सूज येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.(फोटो सौजन्य – istock)

स्ट्रेंथ ट्रेनिंगसोबत कार्डिओचा अचूक मेळ; फॅट लॉस आणि मसल गेनसाठी हा वर्कआऊट प्लॅन ठरेल तुमच्यासाठी बेस्ट!

हातापायांना सूज येण्यामागील सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे शरीरात द्रव साचणे. जास्त वेळ एका जागेवर बसून राहिल्यामुळे किंवा शारीरिक हालचाली न केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम केल्यामुळे किंवा सतत उभे राहिल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात. याशिवाय आहारात मिठाचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरात पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते, ज्यामुळे हातापायांना सूज येते. त्यामुळे हातापायांना वारंवार सूज येत आल्यासारखे वाटतं असेल तर कमीत कमी मिठाचे सेवन करावे. अन्यथा आरोग्य आणखीनच बिघडू शकते.

राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाळी वातावरणात झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दमट हवामान आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडून जाते. गर्भधारणा, हार्मोनल बदल, काही औषधांचे दुष्परिणाम, लठ्ठपणा इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे हातापायांना सूज येण्याची शक्यता असते. शरीराला सूज आल्यानंतर घरगुती उपाय करून सुद्धा आराम मिळवता येतो. पायांना सूज आल्यास गरम पाण्याचा शेक घ्यावा किंवा गरम पाण्यात काही वेळ पाय बिडवून राहावे. दिवसातून एकदा पाय हृदयाच्या पातळीपेक्षा थोडे उंच ठेवून १५ ते २० मिनिटे विश्रांती घेतल्यास पायांमध्ये साचलेला द्रव वरच्या दिशेने वाहण्यास मदत होते.

Natural Collagen Booster : कोलेजनसाठी हजारो रुपये खर्च कशाला? ‘हे’ 5 पदार्थ करतील नैसर्गिक कमाल

शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात जमा झालेले द्रव बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारते. आहारात कमीत कमी मिठाचे सेवन करावे. पापड, लोणची, चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स आणि जास्त खारट पदार्थ वारंवार खाऊ नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात नेहमीच ताजी फळे, भाज्या आणि पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच जास्त वेळ एका जागेवर बसून राहू नये. यामुळे रक्तभिसरणात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे १ किंवा २ तासानंतर उठून बसून काम करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हातापायांना वारंवार सूज का येते?

    Ans: हातापायांना सूज येण्यामागे शरीरात पाणी साचणे, रक्ताभिसरणातील अडथळे, मूत्रपिंड, हृदय किंवा यकृताचे विकार, थायरॉईडची समस्या, जास्त वेळ बसणे किंवा उभे राहणे अशी अनेक कारणे असू शकतात.

  • Que: हातापायांची सूज कमी करण्यासाठी काय करावे?

    Ans: मीठाचे प्रमाण कमी ठेवणे, पुरेसे पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, जास्त वेळ एकाच स्थितीत न बसणे आणि पाय उंच ठेवून विश्रांती घेणे फायदेशीर ठरू शकते.

  • Que: हातापायांची सूज टाळण्यासाठी कोणत्या सवयी उपयुक्त आहेत?

    Ans: संतुलित आहार, नियमित चालणे किंवा व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, पुरेशी झोप, जास्त मीठ टाळणे आणि पुरेसे पाणी पिणे या सवयी सूज टाळण्यास मदत करू शकतात.

Web Title: Do your hands and feet swell frequently this could signal serious health issues learn about the underlying causes and remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

IIT Transfer Rules: आयआयटीमध्ये मेडिकल कारणास्तव ट्रान्सफर होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
1

IIT Transfer Rules: आयआयटीमध्ये मेडिकल कारणास्तव ट्रान्सफर होणार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

आतड्यांमध्ये सडलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, बद्धकोष्ठता आणि पचनाच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका
2

आतड्यांमध्ये सडलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, बद्धकोष्ठता आणि पचनाच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका! चुकीच्या सवयी वाढवतील गंभीर आजार
3

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका! चुकीच्या सवयी वाढवतील गंभीर आजार

कानात कायमच शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो? Tinnitus ची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार
4

कानात कायमच शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो? Tinnitus ची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.