Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टीलच्य़ा बाटलीतलं पाणी चवीला वेगळं लागतंय ? तुम्ही वापरताय ती पाण्याची बाटली सुरक्षित आहे ना ?

स्टीलच्य़ा बाटलीतलं पाणी चवीला वेगळं लागतंय ? तुम्ही वापरताय ती पाण्याची बाटली सुरक्षित आहे ना ? याबाबत तज्त्रांनी केलेला खुलासा जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 10, 2026 | 02:04 PM
स्टीलच्य़ा बाटलीतलं पाणी चवीला वेगळं लागतंय ? तुम्ही वापरताय ती पाण्याची बाटली सुरक्षित आहे ना ?
Follow Us
Follow Us:
  • स्टीलच्य़ा बाटलीतलं पाणी चवीला वेगळं लागतंय ?
  • तुम्ही वापरताय ती पाण्याची बाटली सुरक्षित आहे ना ?
सध्या प्लास्टीक बंदी किंवा प्लास्टिकच्या बाटलीच्या गुणवत्तेबाबत जनजागृती वाढत असल्याने अनेक जण असे आहेत जे पाण्याची बॉटल तांब्याची किंवा स्टीलची वापरततात. तसंही पॉडकास्टच्या माध्यमातून तज्ज्ञांनी सांगितेलेल्या माहितीनुसार आणि आरोग्यासाठी देत असलेला सल्ला यामुळे प्लास्टीक बॉटलचं प्रमाण काही अंशी तरी कमी झालेलं आहे. बरेच जण प्रवासात किंवा ऑफिसला जाणारे स्टीलच्या बॉटलला कायम प्राधान्य देतात.पण तुम्हाला माहितेय का तुम्ही वापरत असलेली स्टीलची पाण्यची बाटली तुमच्या आजाराला कारणीभूत ठरु शकते.

तुमच्या पाण्याच्या बाटलीची गुणवत्ता

बाटलीतल्या पाण्याच्या चवीवरुन त्या पाण्याच्या बाटलीची गुणवत्ता कळते. बऱ्याचदा असं होतं की, स्टीलच्या बाटलीतून पाणी पिताना धातूसारखी पाण्याची चव लागते किंवा पाण्याला वास येतो. याचं कारण म्हणजे पाण्याच्या बाटलीची खराब गुणवत्ता. स्टेनलेस स्टीलच्या पाण्याची बाटली वापरताना त्याची गुणवत्ता जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. या बाटल्यांचं स्टील कमी दर्जाचं असल्याने याची चव बदलते. यामुळे होतं काय तर धातुसारखी चव पाण्यात उतरते. सर्व स्टेनलेस स्टीलचा दर्जा सारखा नसतो. जाणकारांच्या मते, ३०४ किंवा ३१६ ग्रेड स्टेनलेस स्टील पिण्याच्या पाण्यासाठी योग्य आहे. हे ग्रेड गंज आणि रासायनिक प्रतिक्रियांपासून अधिक सुरक्षित असतात, त्यामुळे त्यातून पाण्यात कोणतेही घटक मिसळण्याची शक्यता कमी असते.

वारंवार घसा कोरडा पडतो? आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, वेळीच लक्षणे ओळखून करा उपचार

स्वस्त किंवा कमी दर्जाच्या बाटल्यांमध्ये वापरलेले स्टील ओलावा, उष्णता किंवा आम्लीय पेय (जसे लिंबूपाणी) यांच्या संपर्कात आल्यावर हलकी रासायनिक प्रतिक्रिया देऊ शकते. त्यामुळे पाण्याची चव बदलू शकते. तसं पाहायला गेलं तर स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या आरोग्यासाठी सुरक्षित मानल्या जातात. स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियम आणि निकेल यांसारखी धातू असतात, जे गंज रोखतात आणि पाण्यात मिसळत नाहीत. त्यामुळे साधारणपणे स्टीलच्या बाटलीतलं पाणी पिणं सुरक्षित असतं.तरीही कधी कधी पाण्याची चव वेगळी लागण्याची काही कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, नवीन बाटली नीट धुतली नसल्यास त्यावर कारखान्यातील रसायनांचे अंश राहू शकतात. तसेच, जर बाटली बराच काळ स्वच्छ न करता वापरली तर आतमध्ये बॅक्टेरिया किंवा दुर्गंधी निर्माण होऊन पाण्याची चव बदलू शकते.काही वेळा पाण्यातील खनिजे आणि स्टील यांच्यातील सूक्ष्म प्रतिक्रिया देखील चव बदलण्यास कारणीभूत ठरू शकते. विशेषतः गरम पाणी किंवा लिंबूपाणी दीर्घकाळ ठेवले तर धातूसारखी चव जाणवू शकते.

काय़ काळजी घ्यावी ?

स्टीलची बाटली सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. दररोज बाटली स्वच्छ धुणं, आठवड्यातून एकदा गरम पाणी आणि बेकिंग सोड्याने साफ करणं, तसेच आम्लयुक्त जसं लिंबूपाणी दीर्घकाळ ठेवू नयेत. एकंदरीत, चांगल्या दर्जाची फूड-ग्रेड स्टेनलेस स्टील बाटली वापरली आणि तिची योग्य स्वच्छता ठेवली तर ती आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित ठरते. त्यामुळे पाण्याची चव थोडी वेगळी वाटली तरी घाबरण्याचं कारण नसतं; फक्त बाटलीची स्वच्छता आणि गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे.

उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार बडीशेप सरबत, पचनक्रिया राहील सुरळीत

 

 

 

Web Title: Does the water in a steel bottle taste different is the water bottle you are using safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • health
  • lifestyle tips
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Padma Awards 2026: अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, पण प्रकृतीने वेधलं लक्ष; सहकाऱ्यांच्या मदतीने पोहोचल्या व्यासपीठावर
1

Padma Awards 2026: अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, पण प्रकृतीने वेधलं लक्ष; सहकाऱ्यांच्या मदतीने पोहोचल्या व्यासपीठावर

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा
2

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा

International Yoga Day 2026: योग म्हणजे जीवन…! जागतिक योग दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा
3

International Yoga Day 2026: योग म्हणजे जीवन…! जागतिक योग दिनानिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या हटके शुभेच्छा

जांभूळ मधाचे आरोग्यदायी गुणधर्म वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध, पुण्यातील शास्त्रज्ञांचे संशोधन प्रकाशित
4

जांभूळ मधाचे आरोग्यदायी गुणधर्म वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध, पुण्यातील शास्त्रज्ञांचे संशोधन प्रकाशित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.