Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा

Home Tips : अनेकदा सकाळी बनवलेल्या चपात्या रात्रीपर्यंत कडक होतात. यामागे एक सोपे सायंस आहे जे लक्षात घेतल्यास तुम्ही तुमच्या चपात्यांना दिवसभर मऊ ठेवू शकता. क्रिएटर शिप्रा रायने चपात्यांना दिर्घकाळ मऊ ठेवण्यासाठी काही होम ट्रिक्स शेअर केले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2026 | 08:15 PM
चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा

Follow Us
Follow Us:
  • चपात्या जास्त वेळ ताज्या आणि मऊ राहाव्यात यासाठी साठवण्याची पद्धत महत्त्वाची ठरते.
  • गरम पोळ्यांमधून निघणाऱ्या वाफेचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यांचा पोत टिकून राहतो.
  • स्वयंपाकघरातील एका साध्या वस्तूचा वापर करून पोळ्या कडक होण्यापासून वाचवता येतात.
चपाती हा आपल्या घरात बनणारा एक नेहमीचा पदार्थ आहे. रोजच्या आहारात गव्हाच्या पिठापासून तयार होणाऱ्या चपातीचे भरपूर सेवन केले जाते. पण चपाती खाण्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा ती मऊ असते. चपाती कडक झाली की अनेकांना त्याची चव फारशी आवडत नाही. बऱ्याचदा सकाळी तयार केलेली चपाती दुपारी टिफीनमध्ये नेताच हलकी कडक बनते अशावेळी प्रश्न पडतो की, बनवताना छान फुगलेली मऊ चपाती लगेच कडक झाली कशी…

सुरकुत्या आणि निस्तेजपणाला रामराम; ३ कोरियन ब्युटी हॅक्सने चाळिशीतही दिसाल विशीतले; स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थांची घ्या मदत

आम्ही तुम्हाला सांगतो की, चपाती फक्त गोल आकाराची बनवून आणि तिला फुगवून काही होत नाही. यासोबतच तिला चपातीच्या डब्यात किंवा टोपलीत ठेवताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी अन्यथा ती लवकर कडक होऊ शकते. सोशल मिडियावर शिप्रा रायने चपातीला दिर्घकाळ मऊ ठेवण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स शेअर केल्या आहेत. या घरगुती उपायांमागचं विज्ञान चपात्यांना जास्त वेळ मऊ ठेवण्यास मदत करतं. चला सविस्तर जाणून घेऊया.

डब्यात वाटी ठेवण्याचे सीक्रेट

अनेकदा जेव्हा गरमा गरम चपात्यांना आपण लगेच डब्यात ठेवतो तेव्हा तळाशी पाणी जमा होते ज्यामुळे चपाती हे पाणी शोषूण घेते. यामुळे चपाती ओलसर आणि चिकट होते. शिप्रा राय यांच्या मते, डब्यात चपाती ठेवण्याआधी सुरुवातीला एक लहान वाटी डब्यात ठेवा आणि नंतर त्या वाटीच्या वर सर्व चपात्यांना ठेवायला सुरुवात करा. यामुळे चपाती अजिबात ओलसर होत नाही.

सुती कापडाचा वापर करा

वाटी डब्यात ठेवल्यानंतर डायरेक्ट त्यावर चपात्या ठेवू नका. वाटी ठेवल्यानंतर, भांड्यात एक स्वच्छ आणि कोरडे सुती किंवा मलमलचे कापड घट्ट पसरवा आणि मग यावर गरमा गरम चपात्या ठेवा. हे कापड चपात्यांमधून निघणारी अतिरिक्त वाफ शोषून घेते ज्यामुळे चपात्या ओलसर होत नाही. वाटी आणि सुती कापड यांच्या एकत्रित वापरामुळे पोळ्यांभोवती हवेचे संतुलन टिकून राहते, ज्यामुळे त्या ताज्या राहतात.

चपात्या मऊ कशा राहतात?

अनेकदा लोक चापत्या कडक होण्यापासून वाचवण्यासाठी प्लॅस्टिक किंवा एल्यूमिनियम फाॅईलचा वापर करतात पण याचा वापर आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकतो. पारंपारिक पद्धत पोळ्यांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते. वाटीच्या वापरामुळे तळाशी हवा फिरत राहते आणि सूती कापडात सर्व ओलावा शोषून जातो. यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत चपात्या एकदम मऊ राहतात.

Skin Care Tips: पिंपल्स आणि कोरड्या त्वचेवर ‘या’ पद्धतीने लावा बेसन, टॅनिंगच्या समस्येपासून मिळेल कायमची सुटका

स्टेप बाय स्टेप समजून घ्या

  • सर्वात आधी चपातीच्या डब्याला साफ करा.
  • डब्याच्या मधोमध एक लहान वाटी ठेवा.
  • आता साफ सुती कापड असे पसरवा ज्याने वाटी झाकली जाईल.
  • आता तव्यावर भाजलेल्या गरमा गरम चपात्या यात ठेवा.
  • सर्व चपात्यांना डब्यात ठेवल्यानंतर ५ मिनिटे डबा उघडाच असू द्या.
  • आता चपाती कापडासहित उचला आणि दुसऱ्या कापडाने भांड्याभोवती साचलेली वाफ पुसून टाका.
  • शेवटी चपात्यांच्या खाली ठेवलेली वाटी हटवा आणि डब्याचे झाकण लावा.
 

Web Title: Soft roti storage tip kitchen hack to keep chapati soft fresh all day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Chapati
  • home remedies
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
1

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
2

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
3

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
4

डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.