Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जांभूळ मधाचे आरोग्यदायी गुणधर्म वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध, पुण्यातील शास्त्रज्ञांचे संशोधन प्रकाशित

Jamun For Diabetes: पुण्यातील CSIR आणि NCL शास्त्रज्ञांनी जांभूळ मधावर केलेल्या संशोधनातून त्यात कमी ग्लुकोज आणि जास्त अँटिऑक्सिडंट्स असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केले आहे. या अभ्यासामुळे जांभूळ मध रक्तातील साखरेवर तुलनेने सौम्य परिणाम करणारा नैसर्गिक गोड पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 20, 2026 | 08:41 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • जांभूळ मधाचे आरोग्यदायी गुणधर्म वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध
  • पुण्यातील शास्त्रज्ञांचे संशोधन प्रकाशित
  • जांभूळ मध हा तुलनेने अधिक आरोग्यदायी
सुनयना सोनवणे /पुणे:

पुण्यातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) शास्त्रज्ञांनी जांभूळ मधातील कमी ग्लुकोज आणि उच्च अँटिऑक्सिडंट गुणधर्मांचे वैज्ञानिक पुराव्यांसह प्रमाणीकरण केले आहे. या संशोधनामुळे जांभूळ मध हा तुलनेने अधिक आरोग्यदायी नैसर्गिक गोड पदार्थ असल्याच्या समजुतीला बळ मिळाले आहे.

World Refugee Day 2026 : घर सुटलं, पण आशा जिवंत! वाचा युद्ध आणि संकटांशी लढणाऱ्या लाखो विस्थापितांच्या संघर्षाची कहाणी

डॉ. उदय किरण मरेली यांच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने महाबळेश्वर परिसरातून संकलित केलेल्या ८२ अस्सल जांभूळ मधाच्या नमुन्यांचा अभ्यास केला. न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (एनएमआर) आणि मास स्पेक्ट्रोमेट्री (एमएस) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधकांनी जांभूळ मधाची वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक रचना प्रथमच सविस्तरपणे उलगडून दाखवली. अभ्यासात जांभूळ मधामध्ये ग्लुकोजचे प्रमाण तुलनेने कमी आणि फ्रुक्टोजचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. या साखरेच्या संयोजनामुळे रक्तातील साखरेची पातळी तुलनेने हळूहळू वाढते, असे मानले जाते. त्यामुळे कमी ग्लायसेमिक प्रभाव असलेले अन्नपदार्थ शोधणाऱ्यांसाठी जांभूळ मध हा उपयुक्त पर्याय ठरू शकतो, असे संशोधकांनी नमूद केले आहे.

संशोधनादरम्यान फेनॉलिक आम्ले आणि फ्लॅव्होनॉइड्स यांसारखी जैवसक्रिय संयुगेही ओळखण्यात आली. ही संयुगे मधाच्या उच्च अँटिऑक्सिडंट क्षमतेस कारणीभूत असून शरीरातील मुक्त मूलकांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

या संशोधनातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जांभूळ मधाची अस्सलता ओळखण्यासाठी विकसित करण्यात आलेली नवी वैज्ञानिक पद्धत. प्रगत रासायनिक प्रोफाइलिंगच्या मदतीने जांभूळ मधाचा विशिष्ट ‘मॉलिक्युलर फिंगरप्रिंट’ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अस्सल मध आणि भेसळयुक्त अथवा चुकीच्या लेबलिंगखाली विकल्या जाणाऱ्या उत्पादनांमधील फरक अचूकपणे ओळखणे शक्य होणार आहे.मधातील वाढत्या भेसळीच्या पार्श्वभूमीवर हे संशोधन गुणवत्ता नियंत्रण, अस्सलता पडताळणी आणि ग्राहकांचा विश्वास वाढविण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. हे निष्कर्ष ‘अप्लाइड फूड रिसर्च’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

. International Tennis Day : 12 व्या शतकातील फ्रान्स ते आजचे जागतिक साम्राज्य; पाहा टेनिस या लोकप्रिय रॅकेट गेमचा रंजक प्रवास

Web Title: Jamun honey csir ncl pune research low glucose antioxidant benefits authentication study

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • Diabetics
  • health
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत
1

‘या’ फळांचे सेवन केल्यास वाढू शकतो Diabetes चा धोका, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली
2

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.