Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाज्या खायला आवडत नाही? मग घरी बनवा स्वादिष्ट Vegetable Korma; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच बोटं चाटत राहतील

भाज्या आणि क्रिमी ग्रेव्हीच्या संमिश्रणातून बनलेला व्हेजिटेबल कोरमा चवीला फार अप्रतिम लागतो. याची रिच टेस्ट घरातील सर्वांनाच खुश करून टाकेल शिवाय भाज्यांमध्ये हा पदार्थ तुमच्या आरोग्यासाठीही फायद्याचा ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 17, 2025 | 12:24 PM
भाज्या खायला आवडत नाही? मग घरी बनवा स्वादिष्ट Vegetable Korma; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच बोटं चाटत राहतील

भाज्या खायला आवडत नाही? मग घरी बनवा स्वादिष्ट Vegetable Korma; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच बोटं चाटत राहतील

Follow Us
Close
Follow Us:

व्हेजिटेबल कोरमा ही एक स्वादिष्ट, मसालेदार आणि क्रीमी ग्रेव्ही असलेली उत्तर भारतीय डिश आहे, जी वेगवेगळ्या भाज्या आणि मसाल्यांच्या संमिश्रनातून तयार केली जाते. ही भाजी चपाती, भात किंवा पुरीसोबत खूप छान लागते.ही भाजी विविध रंगीत भाज्यांनी बनवलेली असते आणि त्यात नारळ, काजू व मसाल्यांचा सुंदर संगम असतो.

रात्रीच्या जेवणाला बनवा कोल्हापूर स्टाईल झणझणीत शेवेची भाजी; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

अनेकांना भाज्या खायला फार आवडत नाही, विशेष करून घरातली लहान मुलं! तुम्हीही कोणतीही भाजी मुलांना खायला दिलीत तरी लगेचच मुलं नाक मुरडू लागतात मात्र भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे त्यांचे सेवन आवर्जून करायला हवे. अशात व्हेजिटेबल कोरमाची ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही भाजी चवीला तर चांगली असतेच शिवाय यात वापरण्यात आलेल्या विविध भाज्यांमुळे ती आरोग्यासाठीही फायद्याची ठरते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

कोरमा करीसाठी:

  • मिक्स भाज्या (गाजर, बीन्स, वाटाणा, बटाटा, फुलकोबी) – 2 कप (चिरून)
  • तेल / तूप – 2 टेबलस्पून
  • कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
  • टोमॅटो – 1 मध्यम (चिरलेला)
  • हिरवी मिरची – 1 (चिरलेली)
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – गरजेनुसार
पेस्टसाठी:
  • काजू – 8-10
  • ओले खोबरे – ¼ कप (किव्हा सुके खोबरे वापरू शकता)
  • खसखस – 1 टीस्पून (ऐच्छिक)
  • दही – 2 टेबलस्पून
उरलेल्या चपातीला द्या हटके ट्विट्स! सकाळच्या नाश्त्यात ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट रॅप, नोट करा रेसिपी

कृती

  • व्हेजिटेबल कोरमा तयार करण्यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या धुवून घ्या
  • यानंतर या भाज्या एका भांड्यात टाकून त्यात मीठ आणि पाणी घालून भाज्यांना उकळवून 80% शिजवून घ्या आणि मग यातील अतिरिक्त पाणी काढून टाका
  • काजू, खोबरे, खसखस आणि दही एकत्र करून मिक्सरमध्ये गळ्याला लागत नाही अशी पेस्ट करून घ्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्या जोपर्यंत तो सोनेरी रंगाचा होईल.
  • त्यात आल्यालसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, आणि गरम मसाला घालून 1-2 मिनिटं परतून घ्या.
  • मग यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतून घ्या.
  • तयार केलेली काजू खोबऱ्याची पेस्ट घाला आणि थोडं परतून त्यात उकडलेल्या भाज्या मिसळा.
  • पाण्याचा अंदाज घेऊन ग्रेव्ही हवी तशी शिंपडून घ्या. एक उकळी आली की झाकण ठेऊन 5 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या.
  • दही टाकताना गॅस मंद ठेवा, अन्यथा दही भाजीत फाटू शकते
  • अधिक रिच टेस्ट हवी असल्यास क्रीम किंवा थोडं दूध घालू शकता.
  • ही भाजी नान, पराठा, बटर नान किंवा जीरा राइससोबत अप्रतिम लागते.
  • शेवटी यात कोथिंबीर आणि थोडं फ्रेश क्रीम टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा,

Web Title: Dont like eating vegetables then make delicious vegetable korma at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 12:24 PM

Topics:  

  • food recipe
  • leafy vegetables
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : स्ट्रीट स्टाईल आंबट-गोड अन् चटकदार ‘चिंचेची चटणी’ बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार झटपट
1

Recipe : स्ट्रीट स्टाईल आंबट-गोड अन् चटकदार ‘चिंचेची चटणी’ बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार झटपट

हेल्दी पण चविष्ट असं काही खायचंय? मग आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करा ‘मलाई ब्रोकली’, रेसिपी आहे फार सोपी
2

हेल्दी पण चविष्ट असं काही खायचंय? मग आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करा ‘मलाई ब्रोकली’, रेसिपी आहे फार सोपी

विकतचे कशाला? वाढत्या उन्हाळ्यात पौष्टिक रताळ्यापासून बनवा थंडगार आईस्क्रीम, कधीच विसरणार नाही पदार्थाची चव
3

विकतचे कशाला? वाढत्या उन्हाळ्यात पौष्टिक रताळ्यापासून बनवा थंडगार आईस्क्रीम, कधीच विसरणार नाही पदार्थाची चव

Breakfast Recipe: दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Corn Salad, नोट करून घ्या रेसिपी
4

Breakfast Recipe: दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Corn Salad, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.