
संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट स्नॅक्स! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पराठा पिझ्झा, नोट करा रेसिपी
Food Recipe: लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा खायला खूप जास्त आवडतो. कुठेही बाहेर गेल्यानंतर पिझ्झा खाण्याचा लहान मुलं हट्ट करतात. पण नेहमीच मुलांना मैद्याचा पिझ्झा खायला देण्याऐवजी घरी बनवलेला पिझ्झा खाण्यास द्यावा. वारंवार मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे अपचनाच्या समस्या वाढतात आणि आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे झटपट तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करून पराठा पिझ्झा बनवू शकता. हा पिझ्झा घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागेल. पिझ्झा बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. भाज्या खाण्याचा सगळेच खूप जास्त कंटाळा करतात. कॅफे किंवा हॉटेलमध्ये मिळणारी वेस्टर्न डिश तुम्ही घरीसुद्धा सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता. विकतचा पिझ्झा बेस वापरण्याऐवजी घरीच गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बेस वापरावा. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)