(फोटो सौजन्य: Pinterest)
शेवेची (किंवा शेव) भाजी ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन डिश आहे जी बेसनापासून बनवलेली शेव आणि मसाल्याच्या भाजीच्या ग्रेव्हीने बनलेली असते. ही भाजी चवीला फार चविष्ट आणि झणझणीत लागते. शेवेची भाजी ही महाराष्ट्रात खास कोल्हापुरी पद्धतीने बनवली जाते. ती झणझणीत, मसालेदार आणि तोंडाला पाणी आणणारी असते. विशेषतः जेव्हा भाजीला वेळ नाही, तेव्हा शेव (बारीक किंवा जाड) वापरून झटपट ही भाजी करता येते. गरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते.
मसालेदार ग्रेव्हीमध्ये मिसळलेली कुरकुरीत शेव चवीला अप्रतिमच लागते. रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नसेल तर यंदा शेवेची भाजी आवर्जून बनवून पहा. ही भाजी चपाती अथवा भाकरीसह खाल्ली जाऊ शकते. शिवाय या भाजीला बनवायला फार काही साहित्य किंवा वेळेची गरज भासत नाही. चला तर मग लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा चवदार रसाळ शहाळ्याची भाजी, चवीला लागेल सुंदर पदार्थ
साहित्य






