खराब कोलेस्ट्रॉल आणि युरिक अॅसिड स्वच्छ करण्यासाठी गुणकारी ठरेल सुंठ
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, मूळव्याध इत्यादी गंभीर आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा कमी होऊन जाते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सातत्याने होणारे बदल, हवामानातील बदल, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, कामाचा तणाव इत्यादी गोष्टींचे प्रमाण वाढू लागल्यानंतर आरोग्यावर लगेच गंभीर परिणाम दिसून येतात. तेलकट किंवा तिखट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात.(फोटो सौजन्य – iStock)
हृदयाला आरामाची गरज असल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही ‘लक्षणे, वेळीच सावध होऊन हृदयाची घ्या काळजी
हृदयाच्या आणि शरीरातील इतर रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात बदल करून खाण्यापिण्याच्या सवयींनकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेली खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुंठाचे सेवन करावे. सुंठाचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक अॅसिड नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंठ खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? कशा पद्धतीने सुंठाचे सेवन करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुंठाचे सेवन करावे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि लिपिड-कमी करणारे गुणधर्म आढळून येतात. रक्तामध्ये वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुंठ अतिशय प्रभावी आहे. याशिवाय सुंठ खाल्यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. सुंठमध्ये जिंजरॉल आणि शोगोल नावाचे घटक आढळून येतात, ज्यामुळे रक्तामध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊन जातो.
मागील अनेक वर्षांपासून आयुर्वेदामध्ये सुंठ आणि मध खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्दी, खोकला झाल्यानंतर मध आणि सुंठ एकत्र करून खाण्यास दिले जाते. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यासोबतच वाढलेले कोलेस्टरॉलसुद्धा नियंत्रणातर राहते. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
आतड्यांमधील घाण मुळासकट स्वच्छ होण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, पोट होईल स्वच्छ
सुंठ आणि गरम पाण्याचे एकत्र सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ज्यामुळे पोट स्वच्छ होते आणि पोटावर साचून राहिलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात चिमूटभर सुंठ पावडर टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर पाण्याचे सेवन करा. यामुळे लिव्हरची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होईल. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरेल.