हृदयाला विश्रांतीची गरज असल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे
धावपळीची जीवनशैली जगताना शरीराला आरामाची आवश्यकता असते. सतत काम, मानसिक तणाव, शारीरिक तणाव, वाढत्या जबाबदाऱ्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराला विश्रांती देणे आवश्यक आहे. काम करून घरी दमून आल्यानंतर शरीर पूर्णपणे थकून जातं. कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. मात्र अनेक लोक शरीराला विश्रांती देतात पण हृदयाच्या आरोग्याकडे कधीच लक्ष देत नाही. हृद्यासंबंधित समस्या वधू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करू लागतात. शरीराप्रमाणे हृदयाला सुद्धा विश्रांतीची आवशक्यता असते. हृदयावर भार वाढल्यानंतर अनेकदा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
आतड्यांमधील घाण मुळासकट स्वच्छ होण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, पोट होईल स्वच्छ
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मानसिक आणि शारीरिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे नियमित शरीराला विश्रांती देणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला हृदयाला विश्रांतीची गरज असल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेतात.
शरीरासह हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित पोहायला जाणे आवश्यक आहे. पोहायला गेल्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. तसेच हा व्यायाम नियमित केल्यामुळे हृदयाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. पोहायला गेल्यानंतर सुरवातीचे काही दिवस १० ते १५ मिनिटं पोहावे., त्यानंतर हळूहळू पोहण्याची वेळ वाढवावी.
आतड्यांमध्ये जमलेली घाण काढून टाकतील ‘हे’ 4 पदार्थ, आताच आहारामध्ये करा समावेश
निरोगी आणि फिट राहण्यासाठी नियमित योगासने, प्राणायाम इत्यादी व्यायाम प्रकार करणे आवश्यक आहे. व्यायाम किंवा योग केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. योगासन केल्यामुकले रक्ताभिसरण सुधारते, तणाव दूर होतो आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि शरीराला कोणतीही इजा होत नाही. हृदयाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित योगासने आणि प्राणायाम करावे.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सायकल चालवायला खूप आवडते. सायकल चालवल्यामुळॆ स्नायू बळकट होतात आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. शरीराचे रक्तभिसरण सुधारून हृदयाचे कार्य सुरळीत चालू राहते. सायकल चालवल्यामुळे कॅलरी बर्न होतात आणि स्नायूंचा टोन सुधारण्यासाठी मदत होते.