केसांच्या वाढीसाठी या बिया प्रभावी
सर्वच महिला आणि पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये झालेले बदल, अपुरी झोप, चुकीची जीवनशैली इत्यादींचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर अनेक गंभीर समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. या समस्यांचा परिणाम केसांच्या वाढीवर सुद्धा दिसून येतो. हळूहळू केसांची गुणवत्ता खराब होण्यास सुरुवात होते. तसेच केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे केस खराब होऊ लागतात. केसांची काळजी घेण्यासाठी केस आठवड्यातून दोनदा शॅम्पूचा वापर करून स्वच्छ धुतले पाहिजेत. केस स्वच्छ धुतल्यानंतर केस कोरडे करून केसांना हेअर सिरम लावल्यास केस मऊ आणि सिल्की दिसतील.
शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता भासू लागल्यानंतर केसांच्या वाढीसुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केसांची वाढ थांबणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावे. घरगुती उपाय केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी आहेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारून केस चमकदार आणि सुंदर दिसतात. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी भोपळ्याच्या बियांचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: केसांच्या वाढीसाठी वरदान ठरेल एरंडेल तेल, केस गळतीपासून इतर समस्या होतील दूर
केसांच्या घनदाट वाढीसाठी केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामध्ये भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया, काळे तीळ, मध तुम्ही वापरू शकता. यासाठी पण गरम करून त्यात सुर्यफुलाच्या बिया हलक्याशा भाजून घ्या. भाजून घेतलेल्या बिया थंड करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्याच पॅनमध्ये भोपळ्याच्या बिया आणि कलौंजी घालून भाजा. गॅस बंद करून बियांमध्ये मध मिक्स करा. तयार केलेले मिश्रण नियमित एक चमचा खावे. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये विटामिन ई मुबलक प्रमाणात आढळून येते. तसेच सूर्यफुलाच्या बिया पॉवरफुल एंटीऑक्सिडेंट आहेत. या बिया केसांना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवण्यासाठी मदत करतात. या मिश्रणाचे सेवन केल्यास तुमचे खराब झालेले केस सुधारण्यास मदत होईल. टाळूवर केस व्यवस्थित राहण्यासाठी आहारात सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करावे.
हे देखील वाचा: प्लास्टिक किंवा लाकडी कंगवा कोणता वापरणे अधिक फायदेशीर?
भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि लोह मोठ्या प्रमाणावर आढळून येते. तसेच या बियांचे सेवन केल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. यामध्ये असलेले मायक्रोन्युट्रिएंट्स, फॉस्फरस , आयर्न आणि कॉपर केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी आहेत. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते.